दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाबद्दल अभिनेते प्रकाश राज सातत्याने टीका करत आहेत. या टीकांवर आता अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला नेहमीच प्रामाणिकपणावर विश्वास आहे आणि इतरांना जे वाटतं, त्यावर ते विश्वास ठेवू शकतात, असं अनुपम खेर म्हणाले.
“आता पुन्हा कधीच…” शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची सडकून टीका
केरळ चित्रपट महोत्सवादरम्यान प्रकाश राज यांनी चित्रपटावर टीका केली होती. तसेच या चित्रपटाला ऑस्करसाठी निवडण्यात आल्याच्या खोट्या दाव्याचीही खिल्ली उडवली होती. ‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, प्रकाश यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अनुपम म्हणाले, “लोक त्यांच्या लायकीनुसार बोलत असतात. तसेच काही लोकांना आपले आयुष्य बेईमानीने जगणे आवडते.”
प्रकाश राज काय म्हणाले होते?
“कश्मीर फाइल्स हा सर्वात बकवास चित्रपटांपैकी एक आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आम्हाला माहीत आहे. निर्लज्ज. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्यांच्यावर थुंकतात. पण तरीही त्यांना लाज वाटत नाही आणि दिग्दर्शक अजूनही विचारत आहे की ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’ खरं तर त्याला भास्करही मिळणार नाही,” असं प्रकाश राज तिथे बोलताना म्हटले होते.
विवेक अग्निहोत्रींनी दिलं होतं प्रकाश राजना उत्तर
‘”द काश्मीर फाईल्स या छोट्या चित्रपटाने शहरी नक्षलवाद्यांची झोप उडवली आहे. वर्षभरानंतरही त्यांची पिढी त्रस्त आहे. ते प्रेक्षकांना भुंकणारा कुत्रा म्हणत आहेत. मिस्टर अंधकार राज मी भास्कर कसा मिळवू शकतो, कारण ते सर्व तुझंच आहे,” असं विवेक अग्निहोत्रींनी ट्वीट करत म्हटलं होतं.