Satish Kaushik Birth Anniversary : ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. सतीश कौशिक याचा आज १३ मार्च रोजी वाढदिवस आहे. निधनानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांचा वाढदिवस आला आहे, अशातच चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आठवणींना उजाळा देत आहेत. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र व अभिनेते अनुपम खेर यांनीही एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बू आडनाव का लावत नाही? खुलासा करत म्हणालेली, “मला वडिलांच्या..”

“माझा प्रिय मित्र सतीश कौशिक! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आज बैसाखीच्या दिवशी तू ६७ वर्षांचा झाला असतास. तुझ्या आयुष्यातील ४८ वर्षे मला तुझा वाढदिवस साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले. म्हणून मी ठरवले आहे की आज संध्याकाळी आम्ही तुझा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचा प्रयत्न करू! शशी आणि वंशिका यांच्यासोबतची तुझी जागा रिकामी असेल,” असं कॅप्शन देत अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दोघांचे, कुटुंबाबरोबर व मित्रांबरोबरचे फोटो आहेत. या व्हिडीओवर चाहते कमेंट करून सतीश कौशिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher shares video on satish kaushik birth anniversary hrc