बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर हे लोकप्रिय आहेत. अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनुपम खेर यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अनुपम खेर हे सध्या थायलंडमधील बँकॉकमध्ये फिरताना दिसत आहे. नुकतंच त्यांनी त्या ठिकाणचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
अनुपम खेर यांनी नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते थायलंडच्या रस्त्यावरील दृश्य दाखवताना दिसत आहेत. या व्हिडीओत रस्त्याच्या एका बाजूला शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती पाहायला मिळत आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ १ मिनिटांचा आहे.
आणखी वाचा : “जीवन हे…” अभिनेते अनुपम खेर यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
“मित्रांनो, भारताच्या देवी-देवतांचे, भारताच्या परंपरेचे आणि भारताच्या संस्कृतीचे अस्तित्व संपूर्ण जगभरात आहे. त्याचे महत्त्व काय आहे, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. थायलंडमधील बँकॉक शहरातील एका महामार्गावर रस्त्याच्या कडेला शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे. हे पाहून मी भारावून गेलो आहे. जय शिव शंभो!”, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
“थायलंडमधील नॅशनल हायवेवर शंकर देव, पार्वती देवी आणि गणपतीची मोठी मूर्ती पाहायला मिळणं ही अनोखी पर्वणी होती. कित्येकदा आपल्याला त्यांचे दर्शन घेता येत नाही. पण देवांचा आशीर्वाद सर्व ठिकाणी असतो. भोलेनाथ, ओम नमः शिवाय”,असेही ते म्हणाले.
आणखी वाचा : “यशाची पायरी चढताना…”, अनुपम खेर यांची दीपिका पदुकोणसाठी पोस्ट, शेअर केला खास फोटो
दरम्यान अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्विटरवर दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत ‘ओम नम: शिवाय’, ‘जय श्री राम’ असे म्हटले आहे.