अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलीवूडमधील सर्वात क्यूट जोडप्यांपैकी एक मानले जाते. दोघांनी १९८५ मध्ये लग्नगाठ बांधली. नुकतंच अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत किरण खेर यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

एएनआयशी बोलताना अनुपम खेर यांनी किरण खेरसोबतची त्यांची पहिली भेट आणि त्याची लव्ह स्टोरी सांगितली आहे. अनुपम खेर म्हणाले, किरण आधीच एक स्टार होती, त्या वेळी ती थिएटर करत होती, चित्रपटांमध्ये काम करत होती. ती एमएच्या पहिल्या वर्गात होती. मी तिला चंदीगडमध्ये भेटलो. मी खेड्यातील एक साधा मुलगा होतो. साहजिकच आमच्यात कोणताही संबंध नव्हता.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हेही वाचा- ३२ हजार महिलांचं धर्मांतर केल्याचा दावा, ‘द केरळ स्टोरी’बद्दल शशी थरूर यांचं खुलं आव्हान; म्हणाले, “४ मेपर्यंत पुरावे द्या अन्…”

किरण खेरबद्दल बोलताना अनुपम खेर पुढे म्हणाले, ‘तिचे तेव्हा लग्न झाले होते आणि तिच्याकडे सिकंदर (खेर) होता. किरण आणि मी चांगले मित्र होतो आणि आम्ही एकत्र थिएटरही करायचो. नंतर तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्या तेव्हा तिने मला सांगितले की, तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केली. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. आजही आम्ही नवरा-बायको असलो तरी चांगले मित्र असल्याचे अनुपम खेर यांनी स्पष्ट केलं.

अनुपम खेर यांना सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले, माझी स्मरणशक्ती गमावण्याची मला सगळ्यात जास्त भीती आहे. जर तुमच्याकडे स्मृती नसेल तर तुमच्याकडे काहीही नाही. दिलीप कुमार यांची स्मरणशक्ती गेली. ते एक अद्भुत व्यक्ती होते. एक अद्भुत कथा सांगणारा, अनेक गोष्टींचे अफाट ज्ञान असलेला माणूस होता, असेही अनुपम खेर म्हणाले.

हेही वाचा- “एक गेला म्हणून काय झाले, दोन-चार जण…,” जिया खान आत्महत्या प्रकरणावर राखी सावंतची प्रतिक्रिया

अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते बॉलीवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते ‘वॅक्सिन वॉर आयबी ७१’, ‘इमर्जन्सी’, ‘कागज २’, ‘मेट्रो इन डिनो’ आणि ‘सिग्नेचर इन हिज किटी’ चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.