जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे लूक पोस्टर पाहिल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत नक्की कोणता अभिनेता आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
“मला मुंबई शहर आवडतं, पण…”; भरत जाधवने सांगितलं कोल्हापूरला स्थायिक होण्यामागचं कारण
अनुपम खेर महान कवी आणि तत्त्वज्ञ रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारणार आहेत. अनुपम यांनी चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, ज्यामध्ये अनुपम यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. तसेच लांब दाढी आणि पांढरे केस असून ते जमिनीकडे पाहून काहीतरी विचार करत आहेत.
‘हे माझे भाग्य आहे की मला पडद्यावर गुरुदेवांची भूमिका साकारण्याचे सौभाग्य मिळाले! या चित्रपटाची अधिक माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन!’ असं अनुपम यांनी लुक पोस्टर शेअर करत म्हटलं आहे.
दरम्यान, अभिनेते अनुपम खेर लवकरच अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो इन डिनो’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील.