बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनुपम खेर गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या करियरमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाप्रमाणे ते सोशल मीडियावर ते सक्रीय असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यांना ऑटो रिक्षाने प्रवास करावा लागला आहे.
अनुपम खेर सोशल मीडियावर कायमच हटके पोस्ट शेअर करत असतात. काही दिवसातच त्यांचा शिव शास्त्री बाल्बोआ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. त्या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे, “काहीही होऊ शकत, दिल्लीमध्ये माझ्या शिव शास्त्री बाल्बोआ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग होते ड्रायव्हरने चुकीच्या थिएटरमध्ये नेले, उशीर होईल म्हणून मी सुटाबुटामध्ये रिक्षातून प्रवास केला. खूप मज्जा आली” असा कॅप्शन त्यांनी दिला आहे.
“मला पाकिस्तानात…” राणी मुखर्जीने सांगितला होता परवेज मुशर्रफ यांच्या भेटीमागचा ‘तो’ किस्सा
अनुपम खेर यांनी हा मजेशीर व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “सर तुम्ही महान आहात तुम्ही लहान मोठे असे पाहत नाही,” दुसऱ्याने लिहले आहे, “तुमचा साधेपणा मला खूप आवडतो,” आणखीन एकाने लिहले आहे “शब्दच नाहीत सर माझ्याकडे,” एकाने तर चक्क लिहले आहे “यात भाजपाची चुकी आहे कारण रिक्षेवाल्यांना आप ने प्रशिक्षण दिले आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान अनुपम खेर यांच्या शिव शास्त्री बाल्बोआ या चित्रपटात नीना गुप्ता, जुगल हंसराज, शारीब हाश्मी आणि नर्गिस फाखरी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय वेणुगोपाल यांनी केले असून हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.