चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. शिवाय सतीश यांचे कुटुंबियही कोलमडून गेले आहेत. दरम्यान सतीश यांचे सगळ्यात जवळचे मित्र व सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनाही मित्राच्या निधनामुळे दुःखद धक्का बसला. आता ते कोलकाता येथीला कालीघाट मंदिरामध्ये पोहोचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

सतीश यांच्या अंतिम दर्शनावेळी अनुपम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते सतीश यांच्या पार्थिवाजवळ बसून रडताना दिसत होते. आपल्या अगदी जवळच्या मित्राला अशा अवस्थेत पाहून अनुपम यांना अश्रू अनावर झाले. आता त्यांनी कोलकाता येथील कालीघाट मंदिरामधील व्हिडीओ शेअर केला आहे.

कालीघाट मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर अनुपम म्हणाले, “आज मी कालीघाट मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. मी सगळ्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. माझे मित्र सतीश कौशिक यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठीही प्रार्थना केली. शिवाय मी या मंदिरामध्ये पूजा केली. जय माँ काली”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध रॅपरचं २७व्या वर्षी निधन, गाणं गात असतानाच स्टेजवर कोसळला अन्…; ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांमध्ये येईल पाणी

अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या कपाळावर भगव्या रंगाचा टीका दिसत आहे. तर त्यांच्या गळ्यामध्ये हार आहेत. अनुपम यांनी इन्स्टाग्रामद्वारे लाइव्ह येत सतीश यांच्याबाबत प्रेम व्यक्त केलं होतं. गेली ४५ वर्ष अनुपम व सतीश एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher visit kolkata kalighat temple pray for friend satish kaushik video goes viral on social media see details kmd