बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये तीन महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं. येत्या १२ मार्चला होणाऱ्या ऑस्करसाठी दीपिका प्रेझेंटर म्हणून भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आता अनुपम खेर यांनी तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

दीपिका पदुकोणने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. १२ मार्चला होणाऱ्या ऑस्कर २०२३ ची ती प्रेझेंटर असणार आहे. याची घोषणा झाल्यानंतर दीपिकाला सर्वजण शुभेच्छा देताना आणि तिचं कौतुक करताना दिसत आहेत. अशातच आता अनुपम खेर यांनी दीपिकाचा एक जुना फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

आणखी वाचा- “पठाणमधून पैसे मिळाले नाही?” इकोनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या दीपिका पदुकोणला नेटकऱ्यांचा सवाल

आपल्या इन्स्टाग्रामवर दीपिकाचा जुना फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिलं, “प्रिय दीपिका, या वर्षाच्या ऑस्कर प्रेझेंटरमध्ये तुझा सहभाग झाल्याबद्दल शुभेच्छा. प्रत्येक वेळी जेव्हा तू यशाची एक पायरी वर चढत जातेस तेव्हा मी तुझ्या या प्रवासाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. तुझा गुरू असण्याच्या नात्याने मी नेहमीच हे जाणून होतो की या आभाळाची मर्यादा नाही. तू खूप पुढे जाशील. प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठिशी असतील. ‘पठाण’च्या यशाबद्दल अभिनंदन, जय हो!”

आणखी वाचा- “प्रेग्नन्सीचं नाटक करते”, म्हणणाऱ्यांवर भडकली दीपिका कक्कर; म्हणाली, “तुमच्या सर्वांबरोबर…”

अनुपम खेर यांच्या या पोस्टवर दीपिकाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिलं, “ओह माय गॉड, हे किती गोड आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करताना लिहिलं, “हे खूपच अप्रतिम आहे.” दरम्यान दीपिकाबरोबर या अवॉर्ड सोहळ्यात एमिली ब्लंट, सॅमुअल एल जॅक्सन, ग्लेन क्लोज, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, जॅनेल मोने, जो सलदाना, जेनिफर कॉनेली, रिज अहमद आणि मेलिसा मॅक्कार्थी हे कलाकारही प्रेझेंटर्स म्हणून सहभागी होणार आहेत. ९५ वा अकादमी अवॉर्ड सोहळा येत्या १२ मार्चला लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Story img Loader