बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलियाने गुपचूप साखरपुडा केला आहे. आलियाने बॉयफ्रेंड शेनबरोबर साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत आलियाने साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे.
बालीमध्ये आलियाने साखरपुडा केला आहे. फोटोमध्ये तिने रिंगही फ्लॉन्ट केली आहे. “आणि हे घडलं! माझा बेस्ट फ्रेंड, पार्टनर आणि आता माझा होणारा नवरा…तू माझं प्रेम आहेस. खरं आणि निस्वार्थ प्रेम काय असतं, ते दाखवल्याबद्दल थँक यू. तुला होकार देणं ही माझ्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट होती. तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी मी उत्सुक आहे,” असं म्हणत आलिया कश्यपने पोस्ट शेअर केली आहे.
लेकीच्या पोस्टवर अनुराग कश्यपने कमेंट करत दोघांचंही अभिनंदन केलं आहे. अनुराग कश्यपनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत आलियासाठी खास पोस्ट लिहिली आहे. “आलिया आता मोठी झाली आहे. ती इतकी मोठी झाली आहे की तिचा साखरपुडा झाला आहे,” असं अनुराग कश्यपने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान अनुराग कश्यप व आलियाचं बाप-लेकीचं नातं फार खास आहे. अनेकदा ते सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत पोस्ट लिहिताना दिसतात.