Anurag Kashyap on Phule Movie Controversy : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मोठा वाद झाला आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, पण वादामुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने काही बदल करण्यास सांगितले होते. ते बदल करून ट्रेलर रिलीज करण्यात आला, पण ब्राह्मण समाजातील काही लोकांनी चित्रपटावर आक्षेप घेतला. या संपूर्ण वादावर अभिनेता अनुराग कश्यपने त्याचं मत मांडलं आहे.
अनुराग कश्यपने जातव्यवस्थेवरवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदींनी जातव्यवस्था संपवली, त्यामुळे ‘संतोष’ चित्रपट भारतात रिलीज होऊ शकला नाही; अशी खोचक टिप्पणी अनुरागने केली आहे.
“धडक २ च्या स्क्रीनिंगमध्ये सेन्सॉर बोर्डाने म्हटलं, मोदीजींनी भारतातील जातव्यवस्था संपवली आहे. त्याच आधारे ‘संतोष’ चित्रपट भारतात रिलीज होऊ शकला नाही. आता ब्राह्मणांना फुलेंचा प्रॉब्लेम आहे. भावा, जेव्हा जातव्यवस्थाच नाहीये, तर कोण ब्राह्मण? कोण आहात तुम्ही? तुमचा का जळफळाट होतोय? जातव्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई का होते? एकतर तुमचा ब्राह्मणवाद अस्तित्वात नाही, कारण मोदी ज्यांच्यामते भारतात जातव्यवस्थाच नाही? हे सगळे मिळून लोकांना चु** बनवत आहेत. भाऊ-भाऊ मिळून एकदाच ठरवा भारतात जातीवाद आहे की नाही? लोक चु** नाहीत. एक तर तुम्ही ब्राह्मण आहात का, की जे वर बसलेत ते तुमचे बाप आहेत ते तुम्हीच ठरवा,” अशी पोस्ट अनुराग कश्यपने केली आहे.
पाहा पोस्ट –
‘फुले’ चित्रपटात प्रतीक गांधी व अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. या वादावर प्रतीकने त्याचं मत मांडलं. “मी कुठेतरी शूटिंग करीत होतो आणि मला समजले की चित्रपट दोन आठवड्यांनी पुढे ढकलला गेला आहे. जेव्हा मी निर्मात्यांशी बोललो, तेव्हा मला कारणं समजली. मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टींसाठी वाटले की, ११ एप्रिलला महात्मा जोतिबा फुले यांची १९७ वी जयंती होती. जर तो चित्रपट त्याच तारखेला प्रदर्शित झाला असता, तर तो इतिहासाचा एक भाग झाला असता. ती तारीख महत्त्वाची होती. खरं तर जे आवश्यक बदल करणे गरजेचे होते, ते आधीच केले गेले आहेत. चित्रपटाचा आशय न बदलता जे शक्य होते, ते बदल चित्रपटात केले गेले आहेत,” असं प्रतीक म्हणाला.