अभिनेत्री दिव्या अगरवाल तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिने चांगलं काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यपचा उल्लेख करत तिने काम मागितलं होतं. त्यावर अनुराग कश्यपने प्रतिक्रिया दिल्याचा खुलासा दिव्याने केला आहे. वरुण सूदबरोबर २०२२मध्ये ब्रेकअप करत व्यावसायिक अपूर्व पाडगांवकरशी साखरपुडा करणारी दिव्या मनासारखं काम मिळत नसल्याने चिंतेत आहे. त्यामुळे तिने व्हिडीओ शेअर करत काम मागितलं होतं.
काय म्हणाली होती दिव्या अगरवाल?
“अनुराग कश्यप तुम्ही हे माझे थेट पत्र समजा, मला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. तुमचे पृथ्वी थिएटरमध्ये एक वर्कशॉप बघितले होते तेव्हापासूनच मला तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. माझ्याकडे अनेक वेबसीरिज, मालिका अशी भरपूर काम आहेत, मात्र सध्या मला माझं हृदय जे सांगेल ते काम करायचे आहे,” असं दिव्या अगरवाल म्हणाली होती.
अनुराग कश्यप काय म्हणाला?
‘इंडिया टुडे’शी बोलताना दिव्या अगरवाल म्हणाली, “अनुराग सरांनी मला रिप्लाय दिला. मला खूप आनंद झाला की त्यांनी माझा मेसेज पाहिला. त्यांनी व्हिडीओवर कमेंट केली नसेल पण मला इन्स्टाग्रामवर उत्तर दिलंय. ते म्हणाले की ते भारावून गेले आहेत. मी त्यांना झालेल्या त्रासासाठी माफीही मागितली होती. माझ्यासाठी काही ऑडिशन असल्यास ते मला कळवतील,” असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, दिव्या अगरवाल आधी अभिनेता प्रियांक शर्माला डेट करत होती. पण जेव्हा प्रियांकची हिना खानशी चांगली मैत्री झाली. त्यामुळे दिव्याने प्रियांकशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर दिव्याने वरुण सूदला डेट करायला सुरुवात केली. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने वरुण पाडगावकरशी एंगेजमेंट केली.