अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्यांना वाटत असेल की मी…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

अनुराग कश्यप उत्तम चित्रपट बनवत असला तरी त्याचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात असं नाही. पण तरीही त्याने शाहरुख खान किंवा सलमान खान सारख्या मोठ्या स्टारना घेऊन कधीच चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामागच्या कारणाचा अनुरागने खुलासा केला आहे. “मी इथे चित्रपट बनवायला आलो असलो तरी एक वेळ अशी आली जेव्हा मी त्या (मोठ्या स्टार्सना घेऊन चित्रपट बनवण्याच्या) मोहात पडलो. सगळे मला सांगत होते, ‘मोठ्या स्टार्सशिवाय तू हे करतोस… तर कल्पना कर तू त्यांना घेऊन किती चांगलं काम करणार’. तेव्हा सगळं बदलू लागतं,” असं तो पूजा तलवार यांच्याशी गप्पा मारताना म्हणाला.

Anurag Kashyap Interview: “माझा सिनेमा डार्क नाही, तर…”; अनुराग कश्यपशी दिलखुलास गप्पा

मोठ्या स्टार्सबरोबर काम करायचं म्हटलं की अपेक्षा येतातच याचा उल्लेख करून अनुराग म्हणाला की त्या स्टार्सच्या प्रतिमेशी त्याला खेळता येत नाही, कारण त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता निर्मात्यांना करावी लागते. “ते कसे करायचे ते मला माहीत नाही, जर तुम्ही स्टारसोबत काम करत असताना त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर ते तुम्हाला कॅन्सल करतील. माझा चित्रपट कॅन्सल झाला कारण मी स्वतःचा चित्रपट बनवत होतो. मी कोणाच्याही मित्रांच्या किंवा चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा चित्रपट बनवत नव्हतो,” असं अनुराग म्हणाला.

भारतातील चाहते कट्टर आहेत, याकडे अनुरागने लक्ष वेधले. “इतर देशांमध्ये अशी कोणतीही प्रथा नाही. त्यामुळे तिथे तुम्हाला अधिक स्वातंत्र्य आहे. आपल्या देशात कलाकारांची पूजा केली जाते.” ओटीटी युगातही हे स्टार्स स्टार्सच राहतील, असं अनुराग ठामपणे म्हणाला. “ओटीटीने आता ओटीटी स्टार्ससाठीही जागा मोकळी केली आहे आणि खेळाची बरोबरी केली आहे. चांगल्या कलाकारांना चांगल्या भूमिका आणि चांगल्या पगाराचे चेक ओटीटीमुळे मिळत आहेत. आता पंकज त्रिपाठी किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रपटाचे नेतृत्व करू शकतात,” असं तो म्हणाला.

शाहरुख खान आणि सलमान खान सारखे अभिनेते कधीही त्यांच्या फॅनबेसकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत असं अनुरागने नमूद केलं. तो म्हणाला, “ते प्रयोग करत असताना किंवा वेगळ्या भूमिका करत असतानाही खूप विचार करतात कारण त्यांचे चाहते नाराज झाले तर त्यांच्या प्रतिक्रिया खूप तीव्र असतात. ‘ट्यूबलाइट’ फ्लॉप झाल्यानंतर सलमान खानचे चाहते दिग्दर्शक कबीर खानचा त्रास देण्याच्या उद्देशाने मागे लागले होते,” असंही अनुराग कश्यपने नमूद केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap reveals why he does not work with stars like salman khan shahrukh khan hrc