चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो सातत्याने केंद्र सरकारवर टीका करताना दिसून येतो. अनुरागने अलीकडेच एका नवीन मुलाखतीत भारतावरील त्याच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. तसेच आपण कधीच आपला देश सोडू शकत नाही, असंही तो म्हणाला. अनुरागने यावेळी तो फक्त भाजपावर टीका करतो, असं म्हणणाऱ्या लोकांनाही उत्तर दिलं.
युट्यूबर समदीश भाटियाशी बोलताना अनुराग म्हणाला, “फक्त प्रजासत्ताक दिनाची परेड पाहून किंवा जय हिंदचा जयघोष करून कोणीही देशभक्त होत नाही, चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी उभे राहिल्याने किंवा संधी मिळेल तिथे जय हिंद म्हटल्याने तुम्ही देशभक्त होत नाही. काहींनी नुसती चेष्टा लावली आहे.”
“माझी बायको होशील तर तुला…” निर्मात्याने प्रसिद्ध अभिनेत्रीला दिलेली ऑफर
“माझं भारतावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी देश कधीच सोडू शकत नाही. माझ्या सर्व कथा, संस्कृती आणि माझे खाद्यपदार्थ जे मला खूप आवडतात, ते सर्व इथले आहेत. त्यामुळे बॅग पॅक करून बाहेर जाऊन काम करण्याची माझी हिंमत होत नाही. जेव्हा कोणताच पर्याय उरलेला नसेल, तेव्हा कदाचित मी जाईल,” असं अनुरागने सांगितलं.
“मला सौदीमध्ये अटक केली कारण…” अनुराग कश्यपने सांगितला ‘तो’ कटू अनुभव
अनुराग नेहमी केंद्र सरकारवर टीका करत असतो. याबद्दलही त्याने भाष्य केलं. “माझं भांडण कोणत्याही राजकीय पक्षाशी कधीच झालं नाही, मी नेहमीच लोकांच्या हक्कांसाठी लढलो आहे. माझं भांडण लोकांचे अधिकार काढून घेण्याची धमकी देणाऱ्या सरकारशी आहे. लोकांना वाटतं की मला फक्त भाजपाशी अडचण आहे, पण तसं नाही. काँग्रेस सत्तेत असताना मी काँग्रेसशी लढत होतो आणि आता भाजपा सत्तेत असल्याने मी त्यांच्यासमोर माझे मुद्दे मांडत आहे. मी फक्त सत्तेत असलेल्यांशीच लढतो, राजकीय पक्ष हे माझे लक्ष्य कधीच नव्हते,” असं अनुराग कश्यप त्याच्या राजकीय भूमिकांबद्दल बोलताना म्हणाला. मला माझ्या अधिकारांची जाणीव असून मला देशाची राज्यघटना माहीत आहे, असं तो म्हणाला.