बॉलीवूडमधील आघाडीचा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यपने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याची भेट घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. नव्या होतकरू कलाकारांसाठी अनुरागने दरपत्रक ठरवलं आहे. मला माझा मौल्यवान वेळ वाया घालवायचा नाही, त्यामुळे ज्या कुणाला मला भेटायचं असेल त्यांना आता पैसे मोजावे लागतील, असं अनुरागने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनुरागने लिहिलं, “नवख्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात मी आतापर्यंत माझा खूप वेळ वाया घालवला, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे आता मला अनोळखी लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ज्यांना वाटतं की ते खूप क्रिएटिव्ह व प्रतिभावान आहेत, त्यांना मला भेटायचं असेल तर त्यासाठी मी दर ठरवले आहेत. जर एखाद्याला मला १०-१५ मिनिटांसाठी भेटायचं असेल तर मी एक लाख, अर्ध्या तासासाठी दोन लाख आणि एका तासासाठी पाच लाख रुपये घेईन. हेच दर आहेत. मला लोकांना भेटून वेळ वाया घालवायचा कंटाळा आला आहे. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही माझ्या भेटीसाठी पैसे देऊ शकता, तरंच मला फोन करा नाहीतर दूर राहा. आणि हो पैसे आधी द्यायचे आहेत.”

१६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

या पोस्टबरोबरच त्याने कॅप्शनमध्ये फोन किंवा मेसेज न करण्यास बजावलं आहे. “मला मेसेज, डीएम किंवा कॉल करू नका. तुम्ही पैसे द्या मी तुम्हाला वेळ देईन. मी दानधर्म करायला बसलेलो नाही आणि मी शॉर्टकट शोधणाऱ्या लोकांना कंटाळलो आहे,” असं अनुरागने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अनुरागच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. त्याची लेक आलियानेही यावर कमेंट केली आहे. “जे लोक मला स्क्रिप्ट्स तुम्हाला फॉरवर्ड करण्यासाठी पाठवत आहेत, अशा मेसेज व ईमेल करणाऱ्यांना मी हे फॉरवर्ड करत आहे,” अशी कमेंट आलियाने या पोस्टवर केली आहे.

Story img Loader