अनुराग कश्यपने नुकतंच त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल भाष्य केलं. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला किती अडचणींचा सामना करावा लागला हे अनुरागने सांगितलं. तो काहीतरी चुकीचं, बेकायदेशीर करत असल्यासारखे लोक त्याच्याकडे बघत असायचे. लोक त्याच्या नैतिकतेवर आणि चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करायचे, असंही अनुरागने सांगितलं.
प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा
अनुराग कश्यप म्हणाला, “मला कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही कारण मी प्रत्येक सरकारशी भांडलो आहे. मी जेवढं कमवायला पाहिजे होतं, त्याचा आठवा भागच मी कमवू शकलो कारण माझे बहुतांश चित्रपट पायरसी वेबसाइटवर बेकायदेशीरपणे प्रदर्शित करण्यात आले होते.” पुढे अनुराग म्हणाला, “लोक माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे, ‘मी तुझा चित्रपट पाहिला’ आणि मी म्हणायचो, ‘कुठे पाहिला?’ माझे चित्रपट पॉर्नसारखे पाहिले जायचे. लोक माझे चित्रपट गुपचूप बघायचे.” माझे चित्रपट पाहिल्यानंतर लोक त्याच्या नैतिकतेवर आणि चारित्र्यावर प्रश्न विचारायचे. तो म्हणाला, “त्यावेळी क्रिटिक म्हणायचे, हा कसला माणूस आहे?” अनुरागने हे विधान त्याच्या ‘द गर्ल इन द येलो बूट्स’बद्दल केलं.
मुलाखतीदरम्यान अनुराग म्हणाला, “मला कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही. कारण मी प्रत्येक सरकारशी भांडलो आहे. पण मी लढणं कधीच थांबवणार नाही कारण मी लढायला शिकलो आहे. कालांतराने तुम्ही वेळेसोबत लढायला शिकता. कारण तुम्ही खरोखरच लढू शकता. कारण प्रत्यक्षात सेन्सॉर तुमच्या चित्रपटाला कट करू शकत नाही. त्यांना हे करण्याची परवानगी नाही.”
दरम्यान, नुकताच अनुरागचा अभिनेता म्हणून नवीन प्रोजेक्ट ‘हड्डी’ ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. तसेच झीशान अयुबचीही यात मुख्य भूमिका आहे.