बहुप्रतिक्षीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा बॉलीवूड चित्रपट शुक्रवारी (२८ जुलै) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक करण जोहरचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.५० कोटींची कमाई केली. ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने दुसऱ्या दिवशी जवळपास १६ कोटींची कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने दोन दिवसांत २५ कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

आणखी वाचा : दुसऱ्या दिवशी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या कमाईत वाढ; पार केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा

नुकतंच दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटाचं कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुराग कश्यप आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, “हा आजवरचा करण जोहरचा सर्वात उत्तम चित्रपट आहे. मी हा चित्रपट चक्क दोनवेळा पाहिला आहे. रणवीर आणि आलिया यांची केमिस्ट्रीदेखील अप्रतिम आहे. बऱ्याच दिवसांनी हिंदी कमर्शियल चित्रपटातील लिखाण आणि संवाद मला भावले, आवडले. चित्रपटात रणवीर आणि तोता रॉय चौधरी यांना ‘डोला रे डोला’वर नाचताना बघून मी अवाकच झालो.”

पुढे अनुराग म्हणाला, “मी चित्रपट पाहताना मानमोकळेपणाने हसलो, रडलो, माझं उत्तम मनोरंजन या चित्रपटाने केलं. करणने त्याचं सर्वस्व पणाला लावून हा चित्रपट केला आहे हे यातून स्पष्ट होतं.” करण जोहरने या चित्रपटाच्या माध्यमातून सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केलं आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा आलिया व रणवीर मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader