बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. यावर्षी त्याचा ‘दोबारा’ या चित्रपटाच्या वेळेसही त्याने असंच एक वादग्रस्त वक्तव्यं केल्याने त्याच्या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. अनुराग सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. राजकीय मतं आणि त्याचे विचार मांडताना अनुराग कसलीच भीड बाळगत नाही.

नुकतंच अनुरागने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेली विचित्र पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये अनुरागने शौचायलाचा फोटो पोस्ट केला आहे. ही टॉयलेट साधी सुधी नसून तिथे काही हॉलिवूड स्टार्सने प्रातर्विधी उरकल्याचं अनुरागने स्पष्ट केलं आहे. अनुरागची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
pritish nandi died bollywood celebrities pays tribute
प्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचे निधन, करीना कपूरसह ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; संजय दत्त पोस्ट करत म्हणाला…
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

आणखी वाचा : “काजोल चित्रपटात आहे हे समजताच…” सलाम वेंकीच्या ट्रेलर लॉंचदरम्यान अभिनेता राजीव खंडेलवालचा खुलासा

अनुराग पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये गेला तिथे तो टॉयलेटसाठी जेव्हा गेला तेव्हा तिथल्या कमोडवर लावलेल्या पाट्या वाचून तो हैराण झाला. तिथल्या कमोडच्या वर लिहिले होते की येथे हॉलिवूड स्टार ब्रॅड पीट, अभिनेत्री कॅमेरून डियाज आणि फ्रान्सचे नेते जॅक शिराक सारखे सेलिब्रिटी यांनी या टॉयलेटचा वापर केला आहे. हे पाहून अनुरागने याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे. शिवाय आपण किती नशीबवान आहोत असंही त्याने मस्करीत त्याच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

अनुराग आणि तापसी पन्नूचा ‘दोबारा’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. स्पॅनिश चित्रपट ‘मिराज’चा हा अधिकृती रिमेक होता. अनुराग हा त्याच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘गुलाल’, या चित्रपटांसाठी ओळखला जातो. अनुरागने कित्येक चित्रपटात अभिनयही केला आहे, तो आता पुन्हा एका तामीळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

Story img Loader