अनुराग कश्यपचा चित्रपट म्हटलं की, काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार हे प्रेक्षकांना ठाऊक असतं. मध्यंतरी प्रदर्शित झालेला ‘दोबारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आता मात्र अनुराग पुन्हा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या ‘केनडी’ या आगामी चित्रपटाची गेले बरेच दिवस चर्चा आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अलीकडेच अनुरागचा हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये स्क्रीनिंगसाठी निवडला गेला. या चित्रपटात सनी लिओनी आणि राहुल भट्टसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिल्यांदाच त्याची झलक दाखवली आहे. टीझरमध्ये सनी चार्लीच्या भूमिकेत दिसणार आहे तर राहुल एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

आणखी वाचा : “मी त्याच्या गालावर किस करत…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या कुब्रा सैतचा नवाजुद्दिनबद्दल मोठा खुलासा

अनुराग कश्यपबरोबर सनीचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. सनी तिच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आउट ऑफ द बॉक्स परफॉर्मन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘केनडी’ नावाची ही आगामी मर्डर मेलडी एका सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही. सनीने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करत लिहिले, “बताओ… कितना माझा आया… ये टीझर देख के?”

या चित्रपटाचं लेखन अन् दिग्दर्शन अनुराग कश्यपनेच केलं आहे. हा एक थ्रिलर चित्रपट जरी असला तरी यात एक वेगळीच कॉमेडीदेखील बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझरही त्याच पद्धतीने सादर केला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. २४ मे या दिवशी हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.

Story img Loader