रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीर आणि बॉबी देओल या दोघांच्या कामाचं कौतुक होत आहे. चित्रपटावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड टीका होताना दिसत आहे. स्त्रियांच्या बाबतीत हिंसाचार अन् त्यांना मिळणारी वर्तणूक यामुळे बरीच लोक या चित्रपटावर ताशेरे ओढत आहेत.
चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीजदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत तर काहींनी या चित्रपटाचं कौतुकही केलं आहे. यामध्ये राम गोपाल वर्मा, अर्शद वारसी, अनुराग कश्यपसारखी काही मंडळी सामील आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनुरागने रणबीर आणि त्याची पत्नी आलिया या दोघांबद्दल वक्तव्य केलं आहे.
आणखी वाचा : ‘फेमीनिजम’बद्दलच्या वादग्रस्त विधानावर नीना गुप्ता यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “मला दोष देण्यापेक्षा…”
अनुरागने पिंकव्हीलाशी संवाद साधताना रणबीर आणि आलिया दोघांचं कौतुक केलंच, पण पुन्हा रणबीरबरोबर काम करण्यास मात्र त्याने साफ नकार दिला. याआधी अनुरागने रणबीरसह ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट केला जो बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर या जोडीने पुन्हा एकत्र काम केलेलं नाही. त्याबद्दल अनुराग म्हणाला, “रणबीर आणि आलिया हे सध्या भारतातील सर्वोत्तम कलाकार आहेत, शिवाय ते दोघेही आता लग्नबंधनात अडकले आहेत. ‘अॅनिमल’ यशस्वी ठरलाय हे त्याच्यासाठी खरंच चांगलं आहे.”
पुढे रणबीरसह काम करण्याबद्दल अनुराग म्हणाला, “रणबीरबरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार? हे समजून घ्यायला मला फार वेळ लागला, पण माझ्याकडे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्याचा फॉर्म्युला नाही आणि जेव्हा स्टार्स काही वेगळे प्रयोग करतात तेव्हा त्यांना आणि पर्यायाने मलाही बोलणी ऐकावी लागतात. जेव्हा एखादा अभिनेता स्टार बनतो तेव्हा त्याचे असंख्य फॅन्स तयार होतात अन् मग नंतर आपआपल्या लाडक्या स्टार्सच्या फॅनक्लबमध्येच कशाप्रकारे वाद विवाद होतात हे आपण पाहिलं आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या स्टारबरोबर काम करता तेव्हा त्यांच्या फॅन्सनादेखील तुम्हाला खुश ठेवावं लागतं. काही दिग्दर्शकांना ते बरोबर जमतं, पण मला मात्र ते अजिबात जमत नाही.” असं कारण देत अनुरागने पुन्हा रणबीरबरोबर काम न करण्याबद्दल भाष्य केलं.
‘अॅनिमल’बद्दल आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाबद्दल अनुराग म्हणाला, ““मी अद्याप ‘अॅनिमल’ पाहिलेला नाही, पण चित्रपटाविषयी इंटरनेटवर होणारी चर्चा मला ठाऊक आहे. एखाद्या फिल्ममेकरने कसा चित्रपट काढावा आणि कसा काढू नये हे सांगायचा अधिकार कोणालाही नाही. एका चित्रपटामुळे या देशातील बरेच लोक दुखावले जातात. माझ्या चित्रपटाच्या बाबतीतही लोक असेच व्यक्त होतं, किमान शिकलेल्या लोकांकडून तरी मला असे वर्तन अपेक्षित नाही.”