गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी सुद्धा गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली या लोकप्रिय जोडप्याच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या तयारीची झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘मिमी’च्या यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड, प्रसिद्ध दिग्दर्शकासह करणार काम, शेअर केला फोटो

एकीकडे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषकाच्या निमित्ताने श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे त्याची पत्नी अनुष्का गणपतीच्या तयारी लागली आहे. अभिनेत्रीने घरच्या जिममधून मिरर सेल्फी शेअर केला आहे. अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये घरातील फर्निचर पाहायला मिळत आहे. अर्थात, गणपती बाप्पाचं मखर आणि सजावटीसाठी घरातील बहुतांश वस्तू अभिनेत्रीने जिममध्ये शिफ्ट केल्या आहेत.

हेही वाचा : “‘ती’ भिती ‘सुभेदार’ने खोडून काढली”, विराजस कुलकर्णीने मांडलं मत, म्हणाला, “मोठा हिंदी चित्रपट…”

“जेव्हा गणपती बाप्पासाठी तुम्हाला घरातील संपूर्ण फर्निचर शिफ्ट करायचं असतं तेव्हा जिम ही एकमेव जागा असते. जिथे तुम्ही सगळ्या वस्तू ठेऊ शकता.” असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे. विराट-अनुष्काच्या घरची जिम सध्या जिमच्या उपकरणांशिवाय मोठा सोफा, टेबल- खुर्च्या आणि इतर फर्निचरने भरल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. श्रीलंकेहून परतल्यावर विराट कोहली, पत्नी अनुष्का आणि लेक वामिकासह गणेशोत्सव साजरा करणार आहे.

हेही वाचा : गश्मीर महाजनीचा आवडता मराठी दिग्दर्शक कोण? अभिनेत्याने एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाला, “बाकी कुणीच…”

दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चित्रपटसृष्टीपासून तिने ब्रेक घेतला असला तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. लवकरच अभिनेत्रीचा ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.