बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतर सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट करून फोटोग्राफर्स आणि मीडियाला तिच्या मुलीचे फोटो शेअर न करण्याची विनंती करताना दिसते. भारतीय फोटोग्राफर अनुष्काच्या या खासगी विनंतीचा सन्मानही करत आहेत. पण आता अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अनुष्का शर्मा फोटोग्राफर्सवर चिडलेली दिसत आहे आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे.
अनुष्का शर्मा नुकतीच पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासह मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यावेळीचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ज्यात विराट आणि अनुष्का सुरुवातीला फोटोग्राफर्सना पोज देताना दिसत आहेत पण नंतर अनुष्का फोटोग्राफर्सवर चिडलेली दिसत आहे.
आणखी वाचा- “तिच्या पावलांवर पाऊल ठेवत..” ‘चकदा एक्सप्रेस’च्या सेटवरचा अनुष्का शर्माचा फोटो व्हायरल
फोटोग्राफर्स वामिकाचा व्हिडीओ शूट करत आहेत असं अनुष्काला वाटल्याने ती त्यांच्यावर चिडलेली दिसली. हातवारे करून ती फोटोग्राफर्सना बाळाचे फोटो का घेत आहात असं विचारताना दिसतेय. एवढंच नाही तर तिच्यासह असलेला तिचा स्टाफही यावर आक्षेप घेताना दिसत आहे. बाळाचा व्हिडीओ किंवा फोटो काढू नका असं सांगताना दिसत आहे. त्यावर फोटोग्राफर्स, आम्ही बाळाचा व्हिडीओ किंवा फोटो काढत नाही आहोत असं सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे नेटकरी मात्र अनुष्का शर्माला सुनावताना दिसत आहेत.
आणखी वाचा- आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अखेर ओटीटीवर, इथे पाहता येणार चित्रपट
एका युजरने यावर कमेंट करताना लिहिलं, “कोणालाच त्यांच्या मुलीला पाहायचं नाही. ना तिचा फोटो पाहायचा आहे. पण यांना खूपच गर्व आहे.” दुसऱ्या एक युजरने लिहिलं, “यांचे नखरे पाहा, माणसंच आहेत ना. अल्लू अर्जुनला पाहा रांगेत उभं राहून गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन घेतलं.” आणखी एका युजरने लिहिलं, “यांचे फोटो क्लिक करणंच बंद करा, लवकरच हिचा चित्रपट येईल तोसुद्धा पाहू नका. खूपच अॅटीट्यूड आहे.” तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलं, “यांना एवढं महत्त्व देणं बंद करा.”
दरम्यान जानेवारी २०२२ मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिकाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवशीय मालिका सुरू होती. केपटाऊन स्टेडियममधी अनुष्का आणि वामिकाचा व्हिडीओ बराच चर्चेत होता. मात्र त्यानंतरही अनुष्का आणि विराट यांनी हे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवरून डिलिट करायला लावले होते. तसेच मुलीचा एकही फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती.