अयोध्येत काल, २२ जानेवारीला तयार होणाऱ्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी पूजा सुरू केली. यावेळी मंदिरातील गाभाऱ्यात मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत असे अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला नेतेमंडळींसह बॉलीवूड, टॉलीवूड, क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा व विराट कोहली दिसले नाही. पण नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत अनुष्का या सोहळ्याला उपस्थित असल्याचा दावा केला.
अभिनेत्री अनुष्का शर्मा व विराट कोहलीला काही दिवसांपूर्वी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं होतं. याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामुळे अनुष्का व विराट या सोहळ्याला हजर राहणार असल्याचा चर्चा सुरू होत्या. पण काल सोहळ्याला दोघं कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे अनुष्का गर्भवती असल्यामुळे दोघं गैरहजर होते, असं बोललं जाऊ लागलं. मात्र, काही नेटकरी एक फोटो शेअर करत अनुष्का शर्मा हजर असल्याचा दावा करू लागले.
हेही वाचा – शशांक केतकरने घेतलं नवं घर, स्वतः खुलासा करत म्हणाला “मला सोशल मीडियावर…”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोमध्ये एका महिलेचं अर्ध डोकं दिसत असून त्या महिलेने डोळ्यावर गॉगल लावला आहे. ही महिला अनुष्का शर्मा असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. पण अद्याप फोटोमधली महिला ही अनुष्काचं असल्याचं स्पष्ट झालेलं नाही. मात्र या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – Video: ‘पारु’ मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? ‘जीव माझा गुंतला फेम’ पूर्वा शिंदेसह झळकणार ‘हे’ कलाकार
दरम्यान, अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, राजकुमार हिरानी, विक्की कौशल, कतरिना कैफ, कंगना रणौत, मधुर भांडारकर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.