बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. एकेकाळी रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माच्या डेटींगची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र त्या दोघांनीही या अफवा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर कित्येक वर्षांनी अनुष्काने दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर सिंहबद्दलच्या नात्यावर मनमोकळेपणाने भाष्य केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्का शर्मा काही वर्षांपूर्वी सिमी ग्रेवाल यांच्या एका शो मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला रणवीर सिंहबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने रणवीर सिंहबरोबर डेटींग न करण्याबद्दल मोठा खुलासा केला.
आणखी वाचा : “बोल्ड सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?” प्रिया बापट म्हणाली, “उमेशपेक्षा…”

“मी आणि रणवीर त्यावेळी अस्थिर नातेसंबंधात होतो. आम्ही दोघेही एकमेकांना कधीही मारु शकतो. कारण मी खूप गंभीर असायचे. मी त्याचे डोके कापू शकते किंवा तो माझे कापू शकतो. कारण आम्ही दोघेही आमच्या आयुष्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहत होतो”, असे अनुष्का शर्माने म्हटले होते.

“रणवीर हा खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहे आणि मी अजिबात प्रॅक्टिकल नाही. मला तो आवडतो. तो दिसायलाही आकर्षक आहे. पण मी ज्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, त्याने मला शांत ठेवावे, असे मला वाटत होते. अन्यथा माझे नाते अजिबात टिकणार नाही. रणवीर आणि माझ्यात खूप पॅशन होते. त्यामुळेच आम्ही रिलेशनशिपमध्ये कधीही न येण्याचा निर्णय घेतला”, असे अनुष्का शर्मा म्हणाली होती.

आणखी वाचा : Video : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर भर चित्रपटगृहात स्त्रियांनी केलं असं काही…, मराठी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली…

दरम्यान, रणवीरने दीपिका पदुकोणसोबत लग्न केले आहे. तर, अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली आहे. अनुष्का आणि विराटला एक मुलगी देखील आहे, जिचे नाव वामिका आहे. रणवीरचा जयेश भाई जोरदार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याशिवाय रणवीर ‘सर्कस’, ‘सिम्बा 2’, ‘तख्त’, ‘अन्नियन बॉलिवूड रीमेक’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, अनुष्का ‘चकडा एक्स्प्रेस’ आणि ‘कनेडा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma comment on dating with ranveer singh she denied rumors during interview nrp