अनुष्का शर्माने गेल्या दोन वर्षांत आई म्हणून मोठा त्याग केला आहे, असं वक्तव्य क्रिकेटपटू विराट कोहलीने त्याच्या अभिनेत्री पत्नीसाठी केलं आहे. ती मागच्या दोन वर्षांत जसं जगत आहे, त्या तुलनेत आपल्या आयुष्यात वाटणाऱ्या समस्या या समस्या नव्हत्याच, असंही विराट म्हणाला. त्याने अलीकडेच दिलेल्या या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रीजमध्ये भांड्यात तरंगताना आढळलं डोकं; शरीराचे इतर अवयव गायब, सुप्रसिद्ध मॉडेलच्या खूनाने उडाली खळबळ

“गेल्या दोन वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे. आम्हाला आमचं बाळ झालं आणि त्यासाठी एक आई म्हणून अनुष्काने केलेला त्याग खूप मोठा आहे. तिच्याकडे बघून मला जाणवलं की मला ज्या काही समस्या होत्या त्या तिच्या तुलनेत काहीच नव्हत्या. अपेक्षांबद्दल बोलायचं झाल्यास जोपर्यंत तुमचे कुटुंब तुमच्यावर प्रेम करत असेल, तोपर्यंत तुम्ही फार काही अपेक्षा ठेवू नका कारण ती मूलभूत गरज आहे,” असं विराट त्याच्या आरसीबी पॉडकास्ट दरम्यान म्हणाला.

अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत

अनुष्काने त्याला कशा प्रकारे प्रेरणा दिली, याबद्दलही विराटने सांगितलं. “जेव्हा तुम्ही प्रेरणा शोधता, तेव्हा तुम्ही घरापासून सुरुवात करता आणि साहजिकच अनुष्का माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा तुम्हीही बदलता. तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता आणि त्या गोष्टीमुळे मला चांगल्यासाठी बदलण्याचा आणि गोष्टींचा स्वीकार करण्यास भाग पाडलं” असं विराट अनुष्काचं कौतुक करताना म्हणाला.

Oscar 2023 मध्ये लाइव्ह सादर केलं जाणार ‘नाटू नाटू’ गाणं; अकादमीने ट्वीट करून दिली माहिती

दरम्यान, अनुष्का शर्मा विराट कोहली यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ते पालक बनले. त्यांची लेक वामिका आता दोन वर्षांची झाली आहे. या काळात मुलीचा सांभाळ करत अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूर आहे आणि लवकरच ती पुनरागमन करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma has made massive sacrifices as a mother says virat kohli calls her inspiration hrc
Show comments