फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा व कतरिना कैफ या दोघींनी ‘जी ले जरा’ या चित्रपटाला नकार दिल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर या दोघींच्या जागी अनुष्का शर्मा व कियारा अडवाणी यांचा निर्मात्यांकडून विचार केला जात असल्याचं म्हटलं जात होतं. अशातच आता अनुष्कानं सुद्धा या चित्रपटाची ऑफर नाकारल्याचं वृत्त समोर आलं आहे.

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मानं ‘जी ले जरा’ या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला आहे. अनुष्का हा चित्रपट करण्यासाठी खूप उत्सुक होती. मात्र, शूटिंगला वेळ देण्यासाठी तारखा जुळत नसल्यानं तिनं नकार कळवला आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…

हेही वाचा – विद्या बालनचं पहिलं मानधन माहितीये? मिळाला होता ‘इतक्या’ रुपयांचा चेक

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

कास्टिंगच्या अडचणींमुळे फरहानच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाला चांगलंच ग्रहण लागलं आहे. त्यामुळे फरहाननं आता इतर प्रोजेक्टकडे अधिक लक्ष देण्याचं ठरवलं आहे. आमिर खान निर्मित ‘चॅम्पियन्स’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी फरहाननं होकार दिला आहे. यापूर्वी या चित्रपटासाठी आमिरनं सलमान खानला विचारलं होतं. पण त्यानं नकार दिला. त्यानंतर फरहाननं या चित्रपटाची ऑफर स्वीकारली. आता फरहान ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर ‘डॉन ३’ व ‘जी ले जरा’ या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. ‘डॉन ३’ या चित्रपटात रणवीर सिंहबरोबर फरहान काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व दोन आठवड्यांसाठी वाढवलं; जाणून घ्या कारण ….

दरम्यान, अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. लवकरच अनुष्का ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader