बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं. अनुष्का नेहमी विराटच्या क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावून त्याला सपोर्ट करताना दिसते. तर अनेक मुलाखतींमध्ये विराटदेखील पत्नी अनुष्काबद्दल भरभरून बोलताना दिसलाय. अनेकदा या कपलला ट्रोलदेखील करण्यात आलं आहे, परंतु या कठीण प्रसंगात दोघांनीही कधी एकमेकांची साथ सोडली नाही.

अनुष्का आणि विराटच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहीत आहे. परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की विराट आयुष्यात येण्याआधी अनुष्काने या तीन अभिनेत्यांना डेट करण्यास नकार दिला होता.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”

हेही वाचा… “माझा जवळजवळ गर्भपात…”, मीरा राजपूतने सांगितला ‘तो’ वाईट प्रसंग; म्हणाली, “शाहिद माझ्या डॉक्टरांशी…”

विराट कोहलीला डेट करण्याआधी अनुष्काने रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना रिजेक्ट केलं होतं. करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं. अनुष्काला जेव्हा विचारण्यात आलं की, ती रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी कोणाला डेट करेल आणि कोणाला नाकारेल? तेव्हा अनुष्का म्हणाली की, रणबीर कपूर तर तिचा पहिल्यापासून चांगला मित्रच आहे. अर्जुन कपूरदेखील तिचा मित्र आहे आणि सिद्धार्थ मल्होत्राला ती ओळखत नसल्याने अभिनेत्रीने तिघांना डेट करण्यापासून नकार दिला. अनुष्का शर्माची ही मुलाखत विराट कोहलीला डेट करण्याआधीची आहे.

हेही वाचा… दिव्यांग चाहत्याला ढकललं अन्…, नागार्जुन यांनी ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मागितली माफी, म्हणाले, “मी त्या गृहस्थाची…”

विराट अनुष्काची लव्हस्टोरी

विराट आणि अनुष्का पहिल्यांदा २०१३ मध्ये एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षांनंतर ११ जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या आयुष्यात वामिकाचं आगमन झालं. तर यावर्षी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी या कपलच्या आयुष्यात चिमुकला अकाय आला.

हेही वाचा… “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

दरम्यान, अनुष्का शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अनुष्का शेवटची ‘चकदा एक्स्प्रेस’मध्ये झळकली होती. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा प्रेक्षक अनुष्काला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Story img Loader