बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर अनुष्का सक्रिय आहे. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. शाहरुख आणि अनुष्काची जोडी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहे. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. दरम्यान एका मुलाखतीत अनुष्काने शाहरुखबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- श्वेता नंदाला वहिनी ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही; म्हणालेली, “ती कधीच…”

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

मध्यंतरी अनुष्का शर्मा आणि ‘यारों की बारात’ शोमध्ये अनुष्का शर्माला साजिदने एक प्रश्न विचारला होता. साजिदने अनुष्काला विचारलेलं जर तिला एका दिवसासाठी शाहरुख खान बनण्याची संधी मिळाली तर ती काय करेल. यावेळी अनुष्काबरोबर शाहरुखही उपस्थित होता. या प्रश्नला उत्तर देताना अनुष्का म्हणाली, “मी त्याच्या वाढदिवशी उठेन आणि मन्नतच्या मागे जाईन, जिथे लोक उभे आहेत आणि ‘हे, व्हाट्स अप’ असे ओरडेन.”

अनुष्का पुढे म्हणाली, शाहरुखचा स्टारडम काही वेगळाच आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण काही महिला अशा आहेत ज्या जर्मनीच्या आहेत आणि त्या शाहरुखचे कुठेही शूटिंग सुरु असेल तिथे त्या सेटवर येऊन बसतात. त्या शाहरुखकडून ऑटोग्राफ, फोटो किंवा दुसरं काहीच मागत नाहीत. त्या फक्त तिथे बसून त्याच्याकडे बघत असतात.

हेही वाचा- “मला माझ्या बी व सी ग्रेड चित्रपटांचा अभिमान”, दिग्गज अभिनेत्याचे विधान; म्हणाले, “जेव्हा तुम्ही फक्त…”

अनुष्का आणि शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायच झालं तर, काही दिवसांपूर्वीच शाहरुखचा जवान चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. आता लवकरच शाहरचा डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अनुष्काचा ‘चकदा एक्स्प्रेस’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader