Anushka Sharma : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी २०१७ मध्ये इटली येथे लग्नगाठ बांधली. एका जाहिरातीसाठी शूट करताना या दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर विरुष्काने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट – अनुष्काला ११ जानेवारी २०२१ रोजी वामिका झाली. तर, अकायचा जन्म १५ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला. सध्या हे जोडपं आपल्या दोन्ही मुलांबरोबर लंडनला असतं. विराट-अनुष्का भारतात केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अखेर अनेक महिन्यांनंतर अनुष्का नुकतीच एका कार्यक्रमासाठी भारतात आली आहे. यावेळी अभिनेत्री-डिझायनर मसाबा गुप्ताने तिला वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले.

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ने लोकप्रिय मालिकांना काढलं मागे! ऑनलाइन TRP मध्ये मिळवलं ‘हे’ स्थान, पाहा संपूर्ण यादी…

काय म्हणाली अनुष्का शर्मा?

अभिनेत्रीची ( Anushka Sharma ) दिनचर्या काहीशी वेगळी आहे, ती लवकर जेवते, लवकर झोपते असं बोललं जातं. याबाबत प्रश्न विचारला असता अनुष्का शर्मा म्हणाली, “माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघी रात्री लवकर झोपायचो आणि आता हळुहळू आमचं संपूर्ण घर आमच्यासारखं वागू लागलं आहे. सगळे आम्हा दोघींना फॉलो करतात.”

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma )

“खरंतर लवकर जेवणं, झोपणं हे मी माझ्या लेकीच्या सोयीनुसार सुरू केलं होतं. ती साधारणत: संध्याकाळी ५.३० वाजता तिचं रात्रीचं जेवण जेवायची. त्यानंतर घरी एकटी असल्याने मला प्रश्न पडायचा आता काय करायचं… तर, त्यापेक्षा लवकर झोपूया हा विचार करून मी लवकर जेवून, त्यानंतर काही वेळाने रात्री लवकर झोपायला सुरुवात केली. हळुहळू मला या दिनचर्येची सवय झाली आणि याचे फायदे दिसू लागले. मला चांगली झोप लागायची. सकाळ झाल्यावर फ्रेश वाटायचं… डोक्यावरचा ताण हलका व्हायचा. मी याबद्दल कुठेच वाचलं नव्हतं. याची मला सवय झाली आणि बदल जाणवला त्यामुळे मी या दिनचर्येचे अनुसरण करायला सुरुवात केली. प्रत्येकासाठी हे रुटिन सोपं नसतं. पण, आता हळुहळू आमच्या कुटुंबातील सगळेजण हेच फॉलो करू लागले.” असं अनुष्का शर्माने ( Anushka Sharma ) सांगितलं.

हेही वाचा : “खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी…”, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ अन् क्षिती जोग झळकणार एकाच चित्रपटात, पाहा पोस्टर

दरम्यान, अनुष्काच्या ( Anushka Sharma ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०१८ मध्ये ती शेवटची शाहरुख खानबरोबर ‘झिरो’ चित्रपटात झळकली होती. आता अनुष्का रुपेरी पडद्यावर केव्हा झळकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma reveals she sleeps early because of daughter vamika says eats dinner at evening 5 30 sva 00