बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. अनुष्का शर्माने २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर लग्नगाठ बांधली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून बघितले जाते. ते दोघेही त्यांच्या व्यस्त करिअरमध्येही एकमेकांसाठी वेळ काढत असतात. विराट आणि अनुष्काच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने अनुष्काने लवकर लग्नाचा निर्णय का घेतला याबद्दल सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही ५ वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकले होते. त्या दोघांचा विवाहसोहळा ११ डिसेंबर २०१७ रोजी पार पडला होता. ते दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये दोघांच्यात ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. मात्र काही दिवसानंतर त्यांच्यातील दरी कमी झाली. बऱ्याच चढ-उतारानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इटलीतील टस्कनी येथील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये ते लग्नबंधनात अडकेल. आज त्यांना वामिका नावाची एक मुलगीदेखील आहे.
आणखी वाचा : अनुष्का शर्मा पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम, विराट कोहलीसोबत रुग्णालयात जाण्याचे कारण समोर
नुकतंच अनुष्काने एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनुष्काला इतक्या लवकर लग्न का केले? याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी अनुष्का शर्माने फार मनमोकळेपणाने याला उत्तर दिले. मी तेव्हा विराट कोहलीच्या प्रेमात होती, असे ती यावेळी म्हणाली.
“सध्या सिनेसृष्टीतील प्रेक्षक खूप विकसित झाले आहेत. अनेक प्रेक्षकांना फक्त कलाकारांना पडद्यावर पाहण्यातच रस असतो. त्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्याची काहीही काळजी नसते. तुम्ही विवाहित असाल किंवा तुम्ही आई असाल, याने त्यांना काही फरक पडत नाही. मला या सर्व गोष्टींच्या पुढे जायचे होते. त्यामुळेच मी २९ व्या वर्षी लग्न केले. पण अभिनेत्रींसाठी ते तरुण वयातच होते. त्यावेळी मी विराटच्या प्रेमात वेडी झाले होते म्हणून ते केले आणि आजही त्याच्या प्रेमातच वेडी आहे”, असे अनुष्का म्हणाली.
आणखी वाचा : प्रसिद्ध सेलिब्रेटी कपलने स्कूटीवरुन केली मुंबईची भटकंती, फोटो व्हायरल
दरम्यान अनुष्का ही २०१८ मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित झिरो चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट साईन केला नव्हता ती तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करत होती. पण गरोदरपणा आणि मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने यातून ब्रेक घेतला. यानंतर तब्बल ४ वर्षांनी अनुष्का ही ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.