अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवणाऱ्या अनुष्काचा चाहता वर्ग मोठा आहे. अनुष्का सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी चित्रपट, नवे प्रोजेक्ट याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनुष्का चाहत्यांना माहिती देत असते. अनुष्काने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जुन्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर अनुष्का आता आलिशान आयुष्य जगते. मोठ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अनुष्काने बालपणी राहत असलेल्या तिच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा लष्कर अधिकारी होते. बदली झाल्यामुळे अनुष्का शर्माचं बालपणही अनेक ठिकाणी गेलं आहे. यापैकी मध्य प्रदेशात राहिलेल्या घराशी अनुष्काचं खास नातं आहे. या घराचा व्हिडीओ अनुष्काने शेअर केला आहे. बंगल्यात राहणारी अनुष्का तेव्हा बिल्डिंगमधील एका छोट्याशा घरात राहत होती. दुसऱ्या मजल्यावर तिचं घर होतं. अनुष्काच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये तिची मैत्रीणही राहत होती. अनुष्काने तिच्या बालपणीच्या आठवणींना या व्हिडीओतून उजाळा दिला आहे.

हेही वाचा>> होळीत बांबूच्या झाडाची लाकडे जाळल्याने शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले “हिंदू धर्मात…”

हेही वाचा>> “जुन्या साड्या नेसू नको” आशुतोषबरोबर लग्न केल्यानंतर नेटकऱ्यांचा अरुंधतीला अजब सल्ला, म्हणाले “दोन वाट्यांचं मंगळसूत्र…”

“मध्य प्रदेशात असताना या घरात आम्ही राहायचो.इथेच मी पोहायला शिकले. भावाने माझ्या वाढदिवशी व्हिडीओ गेम घ्यायला लावला, जो तो एकटाच खेळायचा. माझ्या वडिलांच्या स्कूटरवरुन मी इथे फिरायचे. या जागेसाठी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात एक खास जागा आहे”, असं अनुष्काने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा>> “दर महिन्याला तिला १० लाख रुपये पोटगी देतो”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर पत्नी आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली “पुराव्यांसह…”

‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अनुष्का शर्माने एक सो एक हिट चित्रपट दिले. २०१७ मध्ये अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ११ जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. अनुष्का व विराटच्या मुलीचे नावं वामिका असं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma revisited her home in mp shared old house video kak