विराट कोहलीने आपल्या ३५व्या वाढदिवसाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील ४९वं शतक ठोकलं आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७व्या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराटने ४९वं शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबर केली. विराटने हे शतक ११९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने पूर्ण केलं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विराटचं कौतुक केलं जात आहे. पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माने या आनंदाच्या भरात इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे; जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – लवकरच ‘व्हय मी सावित्रीबाई!’ नाटक इंग्रजीमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री झळकणार सावित्रीबाईंच्या भूमिकेत

काही तासांपूर्वी अनुष्काने विराटच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली होती. तिने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर करत लिहीलं होतं की, ‘विराट प्रत्येक भूमिकेत सर्वात आघाडीवर राहिला आहे, तरीही तो कोणते ना कोणते यश मिळवत राहतो. मी तुझ्यावर कायम असेच प्रेम करीन, प्रत्येक क्षणी, काहीही झाले तरी.’ अनुष्काच्या या खास पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आता तिने विराटने ४९वं शतक ठोकल्यावर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मालिकेने मारली बाजी; निर्माती शर्मिष्ठा राऊत झाली भावुक, म्हणाली, “मी आणि तेजसने…”

अभिनेत्री अनुष्का शर्माने विराटचं ४९वं शतक पूर्ण झाल्यानंतरच्या त्या क्षणाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर लिहीलं आहे की, “स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःच गिफ्ट दिलं.” अनुष्काची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

दरम्यान, विराट कोहली पूर्वी अनेक क्रिकेटरने वाढदिवसाच्या दिवशी वनडे शतक झळकावले होते. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांनी वाढदिवशी शतक ठोकलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma share instagram story over virat kohli hits 49th odi century of his career pps