भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये विराटने मैदानावरील खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. विराटचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. आज त्याच्या वाढदिवशी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माने विराटला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन विराटचे काही मजेशीर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये विराट कधी बेडवर तर कुठे अतरंगी प्रकार करताना दिसत आहे. विराटचा वामिकाबरोबरचा एक फोटोही अनुष्काने पोस्ट केला आहे. या फोटोला अनुष्काने “आज तुझा वाढदिवस आहे. म्हणून तुझे हे काही उत्तम फोटो मी पोस्ट केले आहेत. खूप सारं प्रेम”, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> चिरंजीवींसह उर्वशी रौतेला आयटम सॉंग करताना दिसणार, ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटात दाखवणार जलवा

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

विराट आणि अनुष्काने २०१७मध्ये लग्नगाठ बांधली. सेलिब्रिटी जोडींपैकी त्यांची जोडी लोकप्रिय आहे. विरुष्का या जोडीचे लाखो चाहते आहेत. विराट आणि अनुष्काला वामिका ही मुलगीही आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma shared epic photos of virat kohli to wish him happy birthday kak