बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अनुष्काने आतापर्यंत बरेच हिट चित्रपट दिले आहेत. पण मागच्या बऱ्याच काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मुलीच्या जन्माच्या वेळी ब्रेकवर गेलेली अनुष्का शर्मा लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे आणि या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंमुळे अनुष्काला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनुष्का शर्मा मागच्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये ‘चकदा एक्सप्रेस’चं शूटिंग करत आहे. अनुष्का शूटिंग करत असताना चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात अनुष्का शर्मा सफेद शर्ट आणि लाल रंगाच्या स्कर्टमध्ये हातात बॅट पकडून उभी असलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये झुलन गोस्वामीच्या लुकमध्ये असलेल्या अनुष्काचे केस शॉर्ट असलेले दिसत आहेत.

आणखी वाचा- झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणारी अनुष्का ‘छकडा एक्सप्रेस’च्या सेटवरून व्हायरल, पाहा VIDEO

अनुष्का शर्माने झुलन गोस्वामीच्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली आहे. ही व्यक्तीरेखा उत्तम पद्धतीने साकारण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत अनुष्काचा पती विराट कोहलीने सांगितलं होतं की अनुष्काला सुरुवातीला गोलंदाजी करताना समस्या येत होत्या कारण ती पहिल्यांदाच एका खेळाडूची भूमिका साकारत आहे. पण तिच्या स्किल्स पाहून तो खूप खुश आहे.

आणखी वाचा- “तुला लाज वाटत नाही…” १२ वर्षांच्या मुलीबरोबर रोमान्स केल्याने करण कुंद्रावर नेटकरी संतापले

आपल्या आगामी चित्रपटासाठी अनुष्का बरीच मेहनत घेत आहे. पण आता या व्हायरल फोटोंमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मागच्या वेळीही अनुष्काच्या काही व्हायरल फोटोंवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. अनुष्काने झुलन गोस्वामीची भूमिका साकारणं नेटकऱ्यांचा पसंतीस पडलेलं नाही. त्यामुळे ते तिला सातत्याने ट्रोल करताना दिसत आहे. आता तर काहींना तिला, “फक्त हातात बॅट घेतली म्हणून तू झुलन होणार नाहीस” असंही म्हटलं आहे.

दरम्यान मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काचा हा पहिलाच चित्रपट आहे. अनुष्का शर्मा अखेरची आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.