अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच पती विराटच्या क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावत असते. आयपीएलच्या हंगामाच्या सुरुवातीला ती दिसली नाही, परंतु पतीला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का लंडनहून भारतात परतली. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु गेल्या सलग सहा सामन्यांत शानदार कामगिरी करून आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये त्यांनी स्थान मिळवलं, त्यावेळी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित होती. या विजयानंतर अनुष्का शर्माला आनंदाश्रू अनावर झाले होते. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्लेऑफ्समध्ये पोहोचल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फायनलला पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळाली होती. परंतु, आयपीएलच्या ७२ व्या सामन्याला म्हणजेच एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी (२३ मे रोजी) पार पडला. या सामन्यालादेखील विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काने हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यानचा अनुष्काचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा अटीतटीचा सामना सुरू असताना तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.

हेही वाचा… राजकुमार रावने केला ‘गजगामिनी वॉक’; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले, “मलायकासारखा…”

अनुष्काने कालच्या सामन्यादिवशी हिरव्या, लाल आणि निळ्या रंगाचं स्ट्रिप पॅटर्न असलेलं शर्ट परिधान केलं होतं आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली होती. व्हायरल व्हिडीओत अनुष्काच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव दिसले. अभिनेत्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या समर्थकांशी चर्चा करतानादेखील दिसली.

अनुष्काचा हा व्हिडीओ व्हायरल होताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आणि तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव झाल्याने अनुष्का नाराज दिसत आहे”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रत्येक चाहता सध्या अनुष्काशी रिलेट करू शकतो.”

हेही वाचा… VIDEO: “भावाचं ब्रेकअप झालं…”, पृथ्वीक प्रतापचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले…

अनुष्काला अनेकांनी ट्रोलदेखील केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “जेव्हापासून विराटने लग्न केलंय तेव्हापासून त्याला काही ट्रॉफी मिळत नाहीय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अनुष्का सपोर्ट करताना कधीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किंवा भारताची जर्सी का घालत नाही. “तर एक जण अनुष्काला नॅशनल पत्नी पनोती म्हणाला. “मोये मोये” अशी कमेंटदेखील एकाने केली आहे.

दरम्यान, अनुष्काला याआधीही अनेकदा ट्रोल केलं गेलंय आणि विराटने याचं चांगलंच उत्तर वेळोवेळी ट्रोलर्सला दिलंय. अनुष्काने विराटला सपोर्ट करण्यासाठी वेळोवेळी त्याच्या सामन्यांना हजेरी लावली आहे. विराट अनुष्काला त्याचं लेडी लक मानतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharmas tensed video went viral after rcb lost the match dvr