दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीने एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ मध्ये दमदार अभिनय केला होता. तिचे हे दोन्ही चित्रपट गाजले. तिने साकारलेली देवसेना ही भूमिका तिच्यापेक्षा चांगली दुसरं कोणीच साकारू शकत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. आज अनुष्का शेट्टीचा ४१ वा वाढदिवस. अनुष्का शर्मा तिच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचं नाव बाहुबली स्टार प्रभासशीही जोडलं गेलं होतं. एवढंच नाही तर प्रभासने अनुष्का शेट्टीचं लग्नही मोडलं होतं असं बोललं जातं. जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं काय घडलं…

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रभास आणि अनुष्का शेट्टीची जोडी त्यावेळी बरीच गाजली. दोघांच्या ऑनस्क्रिन रोमान्सनंतर खऱ्या आयुष्यातही दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. प्रभास आणि अनुष्का शेट्टी रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा सातत्याने केला जात होता. पण या सगळ्या गोष्टी तेव्हा खरोखरच असल्याचं मानलं गेलं जेव्हा प्रभासमुळे अनुष्का शर्माने खऱ्या आयुष्यात तिचं ठरलेलं लग्न मोडलं. ‘बाहुबली’च्या शूटिंगच्या दरम्यान अनुष्काचं लग्न ठरलं होतं पण प्रभासमुळे ते लग्न मोडलं. यामागे मोठं कारण होतं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा- “भारताला अभिमान वाटेल…” ओम राऊत यांनी केली ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याची घोषणा

प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचं लग्न मोडण्यामागे प्रेम नाही तर प्रोफेशनल कारण होतं. प्रभासने ‘बाहुबली’साठी तीन वर्षे कोणताही दुसरा चित्रपट साइन केला नव्हता आणि त्याने या चित्रपटासाठी खूप जास्त मेहनत घेतली होती. अशात अनुष्कानेही या चित्रपटावर तेवढ्याच गंभीरपणे काम करावं असं त्याला वाटत होतं. जेव्हा त्याला अनुष्काच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा त्याने हे लग्न होऊ दिलं नाही कारण त्याच्या मते लग्नामुळे अनुष्का ‘बाहुबली’साठी आवश्यक असलेला वेळ देऊ शकणार नाही.

आणखी वाचा- प्रभासचे हिंदी चित्रपट आपटल्याने निर्मात्यांना पुन्हा आली शरद केळकरची आठवण, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान या चित्रपटातील प्रभास आणि अनुष्काच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना आवडू लागलेत आणि लवकरच लग्न करणार आहेत असं बोललं जाऊ लागलं होतं. अर्थात त्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये दोघांनीही यावर स्पष्टीकरण देताना आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं म्हटलं आहे. मात्र आता मागच्या काही दिवसांपासून प्रभासचं नाव बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनशी जोडलं जात आहे.

Story img Loader