विवेक ओबेरॉय हा आज ओटीटीच्या माध्यमातून चांगलाच झळकतो आहे, पण एक काळ असा होता जेव्हा विवेक ओबेरॉयला काम मिळायचं बंद झालं होतं. सलमान खानबरोबर झालेल्या वादामुळे विवेक ओबेरॉयचं फिल्मी करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं हे विवेकनेही बऱ्याच मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. अखेर २००७ साली आलेल्या ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटातून विवेकने दमदार कमबॅक केलं.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लाखियाने केलं होतं. ज्यावेळी अपूर्वने विवेकला मुख्य भूमिकेसाठी घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा त्याला बराच विरोध झाला होता कारण तेव्हा चित्रपटसृष्टीत विवेकसह कुणीच काम करण्यास तयार नव्हतं, एकप्रकारे विवेकला बॉयकॉट करायचा प्रयत्न सुरू होता. याबद्दल नुकतंच एका मुलाखतीमध्ये अपूर्व लाखियाने खुलासा केला.
आणखी वाचा : “याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली
यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना अपूर्व म्हणाला, “जेव्हा मी विवेकला मुख्य भूमिकेसाठी घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा बऱ्याच निर्मात्यांनी मला फोन करून विवेकला चित्रपटातून काढायची मागणी गेली. शिवाय जर विवेक ओबेरॉय चित्रपटात असेल तर ते माझ्याबरोबर पुन्हा काम करणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं, पण मीदेखील विवेकला शब्द दिला होता. चित्रपटाचे लेखक संजय गुप्ता, संजय दत्त, सुनील शेट्टी यांनी मला याबाबतीत पाठिंबा दिला. जर हा चित्रपट सुपरहिट ठरला तर ज्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला आहे ते पुन्हा येतील हा माझा विश्वास होता.”
आणखी वाचा : “तू अमिताभ यांचा मुलगा…” चित्रपटाला नकार देणाऱ्या अभिषेक बच्चनवर प्रचंड संतापलेला अपूर्व लाखिया
यापुढे विवेक-सलमान वादाबद्दल बोलताना अपूर्व म्हणाला, “विवेक हा अत्यंत गुणी अभिनेता आहे, त्याने जे केलं ते चुकीचं आहे, त्याने तसं करायला नको होतं याचा अर्थ तो उत्तम कलाकार नाही असं होत नाही. त्याने चित्रपटात उत्तम काम केलं आहे आणि त्यासाठी मी त्याला घेतलं होतं.” ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ हा चित्रपट चांगलाच हीट ठरला. नुकतंच प्रियांका चोप्रानेही विवेक ओबेरॉयचं उदाहरण देत चित्रपटसृष्टीतील कंपूशाही आणि राजकारणाबद्दल भाष्य केलं होतं.