सध्या सगळीकडे आयपीएलचा १६वा हंगाम जोरात सुरू आहे. आयपीएलचा २८वा सामना गुरुवारी (२० एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स या संघांत खेळवला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवण्यात आलेला हा सामना पाहण्यासाठी अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनीही हजेरी लावली होती.

टीम कूकयांच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद अहुजासह उपस्थित होती. सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीम कूक यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कूकनाही आयपीएलची भुरळ पडल्याचं दिसत आहे. कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्याचा त्यांनी आनंद घेतल्याचं फोटोत दिसत आहे.

ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
aamir give advice to kiran rao to be nice wife
घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

हेही वाचा>> “आता तू पण विचित्र…”, फोटोशूटसाठी हटके पोझ दिल्यामुळे प्राजक्ता माळी ट्रोल

“टीम कूक आणि टीम इथे राहण्याचा तुम्ही आनंद घेतला असेल, अशी आशा आहे. भारतातील अॅपलच्या स्टोरसाठी तुम्ही सकारात्मकता ठेवली आहे. हा वर्ल्ड क्लास अनुभव आम्हालाही घेता यावा यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांसाठी आभार,” असं सोनमने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा>> “IPL ही एक भेळ आहे” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली “ऑस्ट्रेलियन माजोरडे…”

दरम्यान, गुरुवारी खेळवण्यात आलेल्या कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने अवघे १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना दिल्लीने चार विकेट्सने हा सामना जिंकला.