अरबाज खान आणि शुरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी मित्रपरिवारासमवेत लग्नगाठ बांधली. अरबाजच्या चाहत्यांना याचा सुखद धक्का बसला, कारण तोपर्यंत या कपलने त्यांच्या नात्याचा कुठेही खुलासा केला नव्हता. अरबाजने सांगितलं की, लग्नाआधी शुरा आणि तो एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने त्याची आणि शुराची पहिली भेट कशी झाली, याबद्दल खुलासा केला आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला की, त्याने निर्मित केलेल्या ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर तो पहिल्यांदा शुराला भेटला. या चित्रपटात रवीना टंडन प्रमुख भूमिकेत होती आणि शुरा रवीनाची मेकअप आर्टिस्ट होती. अरबाजने सांगितलं की, शुरा रवीनाबरोबर सात ते आठ वर्षांपासून काम करत होती. ‘पटना शुक्ला’च्याआधी अरबाज कधीच शुराला भेटला नव्हता किंवा तिच्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं.

Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif ali khan
सैफ अली खानला मुंबईच्या जुहूमध्ये घ्यायचं होतं हक्काचं घर, पण….; अनुभव सांगत म्हणालेला, “इथे मुस्लीम…”
Kaaba
पवित्र काबाला झाकण्यासाठी वापरण्यात येणारे ‘किस्वाह’ नेमके काय आहे?
who is afsar zaidi saif ali khan friend
सैफ अली खानच्या मेडिकल फॉर्मवर कुटुंबियांचं नाही, तर ‘त्या’चं नाव; कोण आहे तो? त्याने सही का केली?
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
saif ali khan reached home after attack
सैफ अली खान रुग्णालयातून पाच दिवसांनी परतला घरी, हल्ला झाल्यानंतरचा अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आला समोर

अरबाज पुढे म्हणाला की, त्यांची लव्ह स्टोरी सेटवर भेटल्यानंतरसुद्धा खूप वेळानंतर सुरू झाली. सेटवरचा त्यांचा संवाद खूप मर्यादित होता. “रवीनाची केसं नीट कर” किंवा “हॅलो”, “हाय” वगैरे असे संवाद दोघांमध्ये व्हायचे. शूट संपल्यानंतर दोघं काही मीटिंग्समध्ये आणि पार्टीजमध्ये भेटले होते. त्यानंतर त्यांची ओळख वाढली. लोकांना कळण्याआधीच ते एक वर्ष एकमेकांना डेट करत होते.

हेही वाचा… “मोदीजी माझ्या भावाचं निधन…”, सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने पंतप्रधान मोदींना केली विनंती, म्हणाली…

अरबाज असंही म्हणाला की, “आम्ही स्वत:ला खूप नशीबवान समजतो, कारण आम्ही एकमेकांना कॉफी शॉप्समध्ये भेटत होतो. मी तिला घरी सोडायलापण जायचो, तरीही आम्हाला मीडिया, पापाराझी किंवा कोणीही स्पॉट केलं नाही.”

हेही वाचा… “अनेकदा मला गुदमरल्यासारखं…”, कतरिना कैफला बॉलीवूडमध्ये काम करताना आला होता ‘असा’ अनुभव, म्हणाली…

दरम्यान, अरबाजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर १९ वर्षांच्या संसारानंतर २०१७ रोजी अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शुराला भेटण्याआधी दोन वर्षांपूर्वी जॉर्जिया एंड्रियानी आणि त्याचं ब्रेकअप झालं होतं.

Story img Loader