Arbaaz Khan Shura khan Wedding : अभिनेता अरबाज खानच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर अरबाज (२४ डिसेंबर रोजी) लग्नबंधनात अडकला. त्याने ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अरबाजच्या पत्नीचे नाव शुरा खान असून त्यांचा विवाहसोहळा अर्पिता खानच्या घरी पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज खानच्या लग्नाला रवीना टंडनने लेक राशा थडानीबरोबर हजेरी लावली. तर, रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख दोन्ही मुलांसह या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. अरबाजचा मुलगा अरहान देखील या लग्नात हजर होता.

कोण आहे अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खान?

सलमान खान, सोहेल खान, आई सलमा खान यांच्यासह संपूर्ण खान कुटुंब या लग्नाला हजेरी लावली. अरबाज वडिलांच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत. अरबाजची दुसरी पत्नी शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे.

अरबाजने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. “आमच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत, मी आणि माझी जोडीदार आयुष्यभराच्या प्रेमाची आजपासून सुरुवात करत आहोत. आमच्या खास दिवशी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे,” असं कॅप्शन त्याने शुराबरोबरचे फोटो पोस्ट करत दिलं आहे.

अरबाज खानच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकार व चाहते कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोराशी झाले होते. त्यांनी सहा वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. १९ वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan married to shura khan wedding photos out hrc