बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या त्याची आगामी वेब सीरीज ‘तणाव’मुळे चर्चेत आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचं करिअर आणि खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. त्याचबरोबर गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आणि त्याच्या वयातील अंतरावरही त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं. मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. हे दोघंही अनेकदा या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात.

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियांनी यांच्या वयात जवळपास २२ वर्षांचं अंतर आहे. एकीकडे अरबाज खान ५५ वर्षांचा आहे. तर जॉर्जिया ३३ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं गेलं आहे. यावर आता अरबाज खानने मौन सोडलं असून नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेम आणि दोघांच्या वयातील अंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे.

bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
May or may not be true Yuzvendra Chahal drops cryptic insta story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘हे खरं पण…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्र चहलने सोडले मौन, इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

आणखी वाचा- “मी फक्त मलायकाचा पती म्हणून…” अरबाज खानने व्यक्त केलं दुःख

गर्लफ्रेंड जॉर्जिया आणि आपल्या वयातील अंतराबाबत आर जे सिद्धार्थ कननशी बोलताना अरबाज म्हणाला, “आमच्या दोघांच्या वयात खूप वर्षांचं अंतर आहे. पण आम्हाला ते कधीच जाणवलं नाही. मी कधी कधी तिला याबाबत विचारतो. पण हा खूपच शुल्लक मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात असता. तेव्हा तुम्ही कधीच खूप पुढचा विचार करत नाही. पण जेव्हा तुम्ही बराच काळ ते नातं सांभाळता तेव्हा इतरही अनेक प्रश्न तुम्हाला सातत्याने विचारले जातात. ज्याची उत्तरही द्यावी लागतात. त्यामुळे आत्ताच यावर बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं.”

आणखी वाचा- “मला थोडं विचित्र वाटलं पण…” २५ वर्षांत पहिल्यांदाच ऑडिशन देणाऱ्या अरबाज खानने व्यक्त केलं मत

दरम्यान जॉर्जियाच्या अगोदर अरबाज खानने मलायका अरोराशी लग्न केलं होतं. दोघांचा प्रेमविवाह होता. १९९८ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर १५-१६ वर्षांनतर त्याचं नात संपुष्टात आलं. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर अरबाजने जॉर्जियाला डेट करायला सुरुवात केली तर दुसरीकडे मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Story img Loader