अभिनेता अरबाज खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध घराण्याचा सदस्य आहे. अरबाजचे वडील सलीम खान एक प्रसिद्ध लेखक आहेत. पण अरबाज खानवर जेवढा आज भाऊ सलमान खानच्या स्टारडमचा दबाव आहे तेवढा वडीलांच्या स्टारडमचा एवढा दबाव नव्हता. त्याच्यासाठी भावाच्या स्टारडमपासून वेगळं होऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. आज २६ वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या अरबाज खानला आजही सलमान खानचा भाऊ म्हणून ओळखलं जातं. एक वेळ तर अशीही होती की त्याला मलायका अरोराचा पती म्हणून ओळखलं जात होतं.

अलिकडेच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने करिअर, नातेसंबंध, घटस्फोट आणि आगामी प्रोजेक्ट्स या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. याबरोबरच या मुलाखतीत अरबाजने सलमान खानचा भाऊ किंवा मलायका अरोराचा पती ही आपली ओळख असल्याचं वाईट वाटतं असं म्हणत नाराजी व्यक्त केली.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

आणखी वाचा- …तरीही सर्वांसमोर एकमेकांना किस करत राहिले रणवीर- दीपिका!

अरबाज खानला जेव्हा विचारण्यात आले की, मीडिया आणि लोकांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे त्याच्या भावंडांबरोबरच्या नातेसंबंधावर परिणाम झाला आहे का? त्यावर तो म्हणाला, “कधीच नाही. मला वाटते की लोक बाहेरून असे गृहीत धरतात की वाईट परिस्थिती आणि अडचणी किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या कदाचित आपल्याला कुटुंबापासून दूर नेतील, पण सत्य हे आहे की या समस्या आपल्याला जवळ आणतात. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी समस्या येते तेव्हा ती आपली काळजी करणाऱ्या व्यक्तींना आणि कुटुंबियांना एकमेकांच्या जवळ आणते. खरंतर आम्ही एक कुटुंब म्हणून खूपच खंबीर झालो आहोत. मीडियाचं आमच्यावर लक्ष असलं तरीही आम्ही एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे आहोत.

आणखी वाचा- “मुलांना जन्म देण्याआधी…” ‘बालदिना’निमित्त ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्धची पोस्ट व्हायरल

अरबाजला जेव्हा विचारण्यात आले की, “कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करावी असे त्याला कधी वाटत होते का?’ तेव्हा तो म्हणाला, ‘एक काळ असा होता की मी याबद्दल थोडा जागरूक होतो आणि काळजीही करत होतो. आता मी मागे वळून पाहतो तर ते निरर्थक वाटतं. त्याला काहीच अर्थ नाही. मला सलीम खानचा मुलगा, सलमान खानचा भाऊ किंवा मलायका अरोराचा नवरा म्हटलं की वाईट वाटायचं. पण मला वाटतं की या अशा गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकत नाही. लोकांची मानसिकता बदलण्यात अर्थ नाही. तुम्हाला फक्त स्वतःला आवरायचे आहे. मला कळून चुकले आहे की मला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणजे लोकांसमोर गोष्टी सिद्ध करण्याची कसरत ही अशी निरर्थक कसरत आहे.”

अरबाज आणि मलायका यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. १९९८ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला होता. अरबाज आणि मलायका यांना अरहान नावाचा एक मुलगाही आहे. मलायका आयुष्यात पुढे गेली असून ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

Story img Loader