अभिनेता अरबाज खानने दीड महिन्यांपूर्वी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. पण तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय अचान घेतला नव्हता, असा खुलासा त्याने केलाय. तसेच तो शुरासह डेटिंग करतोय, याची घरात कुणालाच माहिती नव्हती. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर घरी सांगितलं आणि त्यांच्याकडून नात्याला पाठिंबा मिळाला, असं अरबाज म्हणाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या व शुराच्या वयातील अंतराबाबतही भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाजचे पालक सलीम आणि सलमा खान, भाऊ सलमान व सोहेल आणि बहिणी अलविरा व अर्पिता खान यांना माहित नव्हतं की तो शुराला डेट करत आहे. “सुरुवातीला त्यांना माहित नव्हतं. मी कोणालातरी भेटत आहे, याची कल्पना त्यांना होती पण जेव्हा त्यांना समजलं की मी लग्न करत आहे, तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद झाला. अशावेळी तुमच्या जवळचे लोक तुम्हाला पाठिंबा देतात, कारण त्यांना माहित असतं की हे निर्णय दोन प्रौढ लोकांनी घेतले आहेत,” असं अरबाज खान म्हणाला.

दुसऱ्या लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडने दिलेल्या मुलाखतींबद्दल अरबाज खानचा संताप; म्हणाला, “शुराला भेटेपर्यंत मी…”

शुरा एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. अरबाजने सांगितलं की त्याने व शुराने घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. डेटिंग करताना त्यांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला होता. अरबाज ५६ वर्षांचा असून शुरा अवघ्या ३१ वर्षांची आहे. या दोघांच्या वयात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे. “माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप लहान असली तरी ती १६ वर्षांची नाही. तिला तिच्या आयुष्यात काय हवंय ते माहीत होतं आणि मला माझ्या आयुष्यात काय हवंय ते मला माहित होतं. आम्ही एकमेकांकडून काय अपेक्षा करतो, आम्हाला काय हवं आहे आणि आम्ही आमच्या भविष्याकडे कसं पाहतोय हे समजून घेण्यासाठी एका वर्षात आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. लग्नाचा निर्णय घाईत घेता येत नाहीत,” असं अरबाज म्हणाला.

पती अरबाज खानपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे दुसरी पत्नी; अभिनेता ५६ वर्षांचा, तर शुरा खान फक्त…

अनेकांनी अरबाज आणि शूराचे नवीन प्रवासासाठी अभिनंदन केले, तर इंटरनेटवर काही लोकांनी त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना ट्रोल केले. पण दोघांवर या सगळ्याचा काहीही परिणाम झाला नाही. “आम्हाला याची माहिती नव्हती किंवा आम्ही वय एकमेकांपासून लपवलं असं नाही. एक मुलगी म्हणून तिला माहित होतं की ती काय करतेय आणि मलाही माहित होतं की मी काय करतोय. एकाच वयाचे दोन लोक एकत्र येऊ शकतात आणि कदाचित एका वर्षात वेगळेही होऊ शकतात. मग वय हा नातेसंबंध टिकवून ठेवणारा एकमात्र घटक आहे का? खरं तर, ज्या जोडप्यांच्या वयात खूप अंतर असतं, ती लग्नं जास्त टिकतात,” असं मत अरबाजने मांडलं.

अरबाज खानचं शुरा खानशी दुसरं लग्न, सलमान खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

अरबाज म्हणाला की त्याचे आणि शुराचे एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि समर्पण आहे आणि तेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात तेव्हाच ते टिकतात. “आम्ही आपापल्या आयुष्यात जे काही शोधत होतो त्या गोष्टी जुळून आल्या. आम्ही एकमेकांना वचनबद्धता, प्रेम आणि आदर द्यायला तयार होतो. त्यामुळे त्यापलीकडच्या कोणत्याच गोष्टीचा आमच्या नात्यावर फरक पडला नाही,” असं अरबाज खानने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan reacts on age difference with wife shura khan says didi not hide it hrc