बॉलीवूड अभिनेता व निर्माता अरबाज खानने डिसेंबर महिन्यात शुरा खानशी दुसरं लग्न केलं. अरबाज व शुरा आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांच्या लग्नानंतर अरबाजची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीने मुलाखती दिल्या होत्या. तिने अरबाजबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केलं होतं. या गोष्टी अनावश्यक आणि चुकीच्या होत्या, असं अरबाचने म्हटलंय. ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अरबाजने जॉर्जियाच्या मुलाखतीच्या वेळेचा उल्लेख केला. “मी शुराला भेटण्याच्या जवळजवळ दोन वर्षाआधी माझं पूर्वीचं नातं संपलं होतं,” असंही त्याने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबर २०२३ मध्ये अरबाजने शुराशी लग्न केल्यानंतर काही दिवसांनी जॉर्जियाने अरबाजबरोबरचं नातं आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं. “आम्हाला हा निर्णय घेण्यास बराच वेळ लागला, पण शेवटी आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमचे भविष्यातील प्लॅन्स आणि आयुष्याकडे बघण्याचा आमचा वेगळा दृष्टिकोन होता. आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत आणि मला अजूनही तो खूप आवडते,” असं जॉर्जियाने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितलं होतं.

“भयंकर मेसेज, कमेंट्स, धमक्या…”, ललित कला केंद्रातील हल्ल्याबद्दल भूमिका घेतल्यानंतर प्रियदर्शिनी इंदलकरला आले वाईट अनुभव

अरबाज म्हणाला, “मला माहित आहे की अलीकडच्या काही (जॉर्जियाच्या) मुलाखतींमधून असं वाटतंय की गोष्टी शेवटपर्यंत चांगल्या होत्या, पण हे खरं नाही. मला इथे बसून असं स्पष्टीकरण द्यावं लागतंय हे दुर्दैव आहे पण माझं पूर्वीचं नातं शुराला भेटण्याच्या जवळपास दीड वर्षाआधीच संपलं होतं. आम्ही वर्षभर एकमेकांना डेट केलं होतं. त्या मुलाखतींमध्ये कोणतीही टाइमलाइन दिलेली नव्हती आणि अशा मुलाखतींमुळे लोकांचा असं वाटतं की मी हे नातं अचानक संपवलं, पण तसं नाही. शुराला भेटेपर्यंत मी जवळपास दीड वर्ष कुणालाही डेट करत नव्हतो. हेच सत्य आहे.”

अरबाज खानचं शुरा खानशी दुसरं लग्न, सलमान खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

ब्रेकअपनंतर दोन वर्षांनी याबद्दल जॉर्जियाने बोलणं अरबाजला योग्य वाटलं नाही. “मी लग्न करत असताना आणि लग्नानंतर कोणीतरी ब्रेकअपबद्दल बोलावं ही वेळ थोडीशी चुकीची वाटते. जर तुमचे जवळपास दोन वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले असेल आणि तुम्ही त्यावेळी काहीच न बोलता अचानक आता बोलणं अयोग्य आहे,” असं अरबाज म्हणाला.

पती अरबाज खानपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे दुसरी पत्नी; अभिनेता ५६ वर्षांचा, तर शुरा खान फक्त…

“सार्वजनिक ठिकाणी आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांबद्दल बोलणं बरोबर नाही. संपूर्ण जगाला माहित होतं की मी या व्यक्तीबरोबर डेट करत आहे, आता दोघेही आयुष्यात पुढे गेलो आहोत. कदाचित आता त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी असेल, असा विचार करून तरी या टप्प्यावर माझ्याबद्दल बोलायचं नको होतं,” असं अरबाजला वाटतं.

“मला माहित नाही की एखाद्याला असं का करावंसं वाटलं असेल. पण आता सगळं काही ठीक आहे आणि मी माझ्या आयुष्यात पूर्वी येऊन गेलेल्या लोकांनाही शुभेच्छा देतो. मला माहित आहे की ते खूप आधीच त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मला हीच गोष्ट खटकली की आम्ही कधी वेगळे झाले याची टाइमलाइन न देता मुलाखतीत त्याबद्दल बोललं गेलं. मी याबद्दल बोलण्याच्या संधीची वाट पाहत होतो. जेव्हा तुम्ही काही गोष्टींबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज असते कारण तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल बोलत असता,” असं अरबाज खान म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan reacts on ex girlfriend giorgia andriani interview about breakup after his marriage hrc