बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी आपल्या चित्रपटामधील भूमिकेमुळे, कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडीओमुळे तर कधी त्यांच्या व्यक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनताना दिसतात. आता अरबाज खानने जेव्हा वडील सलीम खान यांनी दुसरे लग्न केले तेव्हा त्यांच्या आईची प्रतिक्रिया काय होती, हे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या आयुष्यावर आधारित ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंटरी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये सलीम खान यांनी जेव्हा सलमा खान यांच्याबरोबर लग्न झालेले असताना जेव्हा अभिनेत्री हेलन यांच्याबरोबर दुसरे लग्न केले, त्यावेळी सलमा खान यांनी ती परिस्थिती कशी हाताळली आहे, हे पाहायला मिळते.

काय म्हणाला अरबाज खान?

अरबाज खानने वडिलांनी जेव्हा दुसरे लग्न केले होते, त्यावेळची आठवण सांगितली आहे. तो म्हणतो, “माझी आई सलमा खानने वडिल सलीम खान किंवा हेलन आंटी यांच्याबरोबर वाईट वागण्यास कधीही प्रभावित केले नाही. त्या काळात तिला त्रास झाला पण तुझे वडील वाईट आहेत किंवा असे वागत आहेत, असे तिने आम्हाला कधीही सांगितले नाही.

आम्ही आजही आमच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीला हेलन आंटी अशी हाक मारतो, कारण त्यावेळी ती हेलन आंटी होती. पण आईसारखीच वागणूक तिलाही देतो. ती आमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. ती आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा भाग व्हावी, यासाठी माझ्या आईने प्रयत्न केले आहेत.” अशी आठवण अरबाज खानने सांगितली आहे.

हेही वाचा: “माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”

याबरोबरच, सलीम खान यांनी हेलेन यांच्याशी लग्न केल्याची बातमी कशी सांगितली, याचा खुलासादेखील त्यांनी या डॉक्युमेंटरीमध्ये केला आहे. मी माझ्या मुलांना खाली बसवले, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना म्हटलं, तुम्हाला आता ही गोष्ट समजणार नाही पण, ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी तुम्हाला समजेल. तुम्ही तुमच्या आईवर जितके प्रेम करता तितकं तुम्ही हेलनवर करू शकणार नाही पण मला तिच्यासाठी तुमच्याकडून तेवढाच आदर हवा आहे. कारण प्रेम हे आदर करण्यात असते, असे अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.

दरम्यान, हेलन यांनीदेखील या डॉक्युमेंटरीमध्ये खान परिवाराकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan remembers mothers reaction when father salim khan married to helen nsp