सलमान खान आणि अरबाज खान या जोडगोळीने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांच्या ‘दबंग’ या चित्रपटाच्या सिरीजने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. या चित्रपटात सलमान खानची चुलबुल पांडेची शैली सर्वांनाच आवडली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे तीन भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाले असून सलमान खानचा भाऊ अरबाज खान यानेच याचे दिग्दर्शन केले आहे. ‘दबंग ३’ नंतर सलमान खान आणि चित्रपटाचे चाहते चौथ्या भागाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत लोकांची उत्सुकता शमवण्यासाठी अरबाज खानने एका मुलाखतीत चित्रपटाच्या चौथ्या भागाबाबत मोठा इशारा दिला आहे.

आणखी वाचा : राजकुमार रावला विचारत न घेताच ‘स्त्री’च्या सिक्वेलची घोषणा? अभिनेता म्हणाला, “हा चित्रपट…”

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Lakhat Ek Aamcha Dada
अखेर डॅडींचा प्लॅन यशस्वी होणार; तेजूचा होणारा नवरा लग्नातून गायब होणार, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”

अरबाज खान सध्या सोनी लिव्हवरील आगामी ‘तनाव’ या सिरीजमुळे चर्चेत आहे. या सिरीजमध्ये अरबाज खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजच्या प्रमोशनच्या निमित्ताने अरबाज खानने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्याने ‘दबंग ४’ हा त्याच्या आगामी प्रोजेक्टपैकी एक आहे आणि लवकरच तो ‘दबंग’ या सुपरहिट चित्रपटाचा नवा भाग घेऊन येणार आहे, असं त्याने सांगितलं.

‘दबंग ४’बद्दल बोलताना अरबाज खानने सांगितलं की, “या चित्रपटावरील त्याचे काम सुरू आहे. पण हा चित्रपट बनवण्यासाठी त्याला आणि सलमान खानला आपापल्या प्रोजेक्टमधून थोडं मोकळं व्हावं लागेल. ‘दबंग ४’ रिलीज करायला ‘दबंग २’ आणि ‘दबंग ३’ इतका वेळ लागणार नाही.”

हीहे वाचा : Bigg Boss 16: ” तू ढोंगी…”, अखेर सलमान खानने साजिद खानबाबत व्यक्त केली नाराजी

पुढे तो म्हणाला, “मी लवकरच माझ्या सध्या सुरु असलेल्या प्रोजेक्ट्समधून मोकळा होईन आणि ‘दबंग 4’ या चित्रपटावर लक्ष केंद्रित करेन. कारण हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. मला हा चित्रपट खूप मन लावून आणि प्रेमाने बनवायचा आहे. यासोबतच या चित्रपटातून मला प्रेक्षकांच्या अपेक्षाही पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात ‘दबंग 4’ची अधिकृत घोषणा होईल अशी मला आशा आहे.”

Story img Loader