बॉलीवूड अभिनेता आरबाज खानने गेल्यावर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शूरा खानबरोबर अरबाज लग्नबंधनात अडकला. आरबाज व शूराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, शूराच्या वाढदिवसानिमित्त आरबाजने रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवर आरबाजने शूराबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “माझी प्रिय शूरा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याइतके मला कोणीही हसवत नाही. मला म्हातारपणापर्यंत तुझ्याबरोबर राहायचे आहे. आपण एकत्र येणे ही माझ्या बाबतीत घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहे.”

people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
raha kapoor birthday mommy alia bhatt shares sweet picture and write special post
“तू फक्त काही आठवड्यांची होतीस…”, लाडक्या लेकीच्या वाढदिवशी आलियाने शेअर केला २ वर्षांपूर्वीचा फोटो, राहाला म्हणाली…

आरबाजने पुढे लिहिलं, “जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्यासोबत डेटला गेलो होतो, तेव्हाच मला जाणवलं होतं की, मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवणार आहे. तू नेहमी तुझ्या सौंदर्याने आणि दयाळूपणाने मला आश्चर्यचकित करते. जेव्हा मी तुझ्यासाठी कबूल है म्हणालो, हे शब्द माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगले शब्द होते, जे मी तुझ्यासाठी उच्चारले होते. माझं तुझ्यावर प्रेम आहे.” आरबाजची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत शूराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा सिक्वेल येणार; दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांची पोस्ट व्हायरल

गेल्या वर्षी २४ डिसेंबरला आरबाज आणि शूराचा लग्नसोहळा पार पडला. आरबाज खानची बहीण अर्पिता खानच्या घरी या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाला रवीना टंडन, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, फराह खान, साजिद खान यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.