बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सना संधी मिळणं हे आता सगळ्यांसाठी सवयीचं झालं आहे. जोया अख्तरसुद्धा तिच्या नव्या वेबसीरिजमधून सुहाना खान आणि अगस्त्य नंदा या दोन स्टारकिड्सना पुढे आणणार आहे. आता यात आणखी भर पडली आहे ती अरबाज खानचा मुलगा अरहान खानची. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार अरहान खानदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. पण तो एक अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत काम करू इच्छित आहे असं अभिनेता अरबाज खानने स्पष्ट केलं आहे.

अरहान हा अरबाज आणि मलायका अरोरा यांचा एकुलता एक मुलगा आहे. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं आणि तब्बल १८ वर्षाच्या संसारानंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला. अरबाजच्या आगामी चित्रपटासाठी काम करायची इच्छा अरहानने दर्शवून दिली असल्याचं अरबाजने सांगितलं आहे. तसेच याआधीसुद्धा अरहानने सहाय्यक म्हणून काम केल्याचंही अरबाजने स्पष्ट केलं आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Encounter Specialist Daya Nayak Arrives at Saif Ali Khan home
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर

आणखी वाचा : तीन अफेअर, दोन लग्नं करूनही ६८ वर्षांचे कमल हासन आजही सिंगल; जाणून घ्या त्यांच्या लव्हलाईफबद्दल

याविषयी बोलताना अरबाज म्हणाला, “माझा मुलगा सध्या ‘लॉन्ग आयलंड फिल्म स्कूल’ येथे शिक्षण घेत आहे. त्याला हे काम प्रचंड आवडत आहे. तो स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकत आहे, स्वतःचे मित्र बनवत आहे, तो तिथे बरंच काही शिकतोय आणि एक पालक म्हणून मला त्याचा अभिमान आहे.” शिवाय अरहानने दिग्दर्शक करण जोहरबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आगामी चित्रपटात काम केलं आहे असंही अरबाजने स्पष्ट केलं.

करणच्या ‘रॉकी और रानीकी प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी अरहान आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांनी सहाय्यक म्हणून काम केल्याचं समोर येत आहे. आता येणाऱ्या काळात अरहान आणखी उत्तम फिल्ममेकिंगबद्दल शिकता यावं यासाठी तो अरबाज खानच्या आगामी चित्रपटातसुद्धा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. अरबाजचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader