अभिनेता अरबाज खानने रविवारी (६ ऑक्टोबर २०२४) इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सत्र आयोजित केलं होतं. या सत्रात अरबाज खानने चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. त्याने या सत्रात त्याची पत्नी शुरा खान, मुलगा अरहान खान, वडील सलीम खान आणि भाऊ सलमान खान यांच्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. सलमानचं लग्न, अरबाजला सलमान खानबद्दल काय आवडतं आणि अरबाज स्वतः पुन्हा लग्न करणार का, याबद्दलदेखील त्याने चाहत्यांना उत्तरं दिली.

सलीम खान आणि सलमानबद्दल भाष्य

एका चाहत्यानं विचारलं, “सर, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट प्रेरित करते? सलीम साहेब आणि सलमान यांच्यातली एक अशी सवय, जी तुम्हाला कायमस्वरूपी आत्मसात करायची आहे?” यावर उत्तर देत अरबाज म्हणाला, “सलीम साहेबांची प्रामाणिकता आणि सलमानचा समर्पणभाव.”

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”

हेही वाचा…Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?

एका चाहत्यानं “तुम्ही इतके देखणे का आहात?” असा प्रश्न विचारला असता, अरबाजने उत्तर दिलं, “माहीत नाही, माझी पत्नी शुरालाही असंच वाटतं.” त्याचा मुलगा अरहानबरोबरच्या नात्यावर विचारण्यात आलं असता तो म्हणाला, “अरहान खूप जवळचा आहे, तो मित्रासारखा आहे.”

‘पुढच्या लग्ना’विषयी अरबाजचं उत्तर

‘तुमची आवडती व्यक्ती कोण?’ असा प्रश्न विचारल्यावर अरबाज म्हणाला, “माझे वडील श्री. सलीम खान.” त्याच्या ‘पुढच्या लग्ना’विषयी विचारलं असता, अरबाजने मजेशीर उत्तर दिलं, “बस झालं भाऊ”, असं म्हणत त्याने हसणारा इमोजी वापरला.

arbaaz khan give answer to fan question
अरबाझ खानला चाहत्याने इन्स्टाग्रामवर पुढच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले आहे. (Photo Cresit : arbaaz khan Instagram Story)

हेही वाचा…“मला खूप काम करायला लावतात,” असं म्हणत राजेश खन्नांनी दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात काम करण्यास दिलेला नकार

सलमानशी करायचं आहे लग्न

एका चाहतीनं अरबाजला विचारलं, “मला तुमच्या मोठ्या भावाशी म्हणजेच सलमान खानशी लग्न करायचं आहे.” यावर उत्तर देताना अरबाज म्हणाला, “मी काय म्हणू? ‘लगे रहो मुन्नाभाई.” हे उत्तर देताना त्याने ‘लगे रहो मुन्नाभाई या प्रसिद्ध चित्रपटाचा संदर्भ दिला.

शुरा खानच्या स्वयंपाकाबद्दल अरबाजचं उत्तर

अरबाजला इन्स्टाग्रामवर एका चाहत्यानं विचारलं, “शुरा काय चांगलं बनवते?” यावर अरबाजने मजेशीर उत्तर दिलं, “ती फक्त स्टोरीज चांगल्या बनवते.” मात्र, लगेचच त्याने गंमत करत असल्याचं सांगत, “शुरा मटण बिर्याणी उत्तम बनवते,” असं स्पष्ट केलं. एका चाहत्यानं म्हटलं, “तुमची पत्नी शुरा खूप सुंदर आहे.” यावर उत्तर देताना अरबाज म्हणाला, “धन्यवाद! हो, ती खूप सुंदर आहे.”

arbaaz khan give answer to fan question
अरबाझ खानला चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्याने उत्तरं दिली आहेत. (Photo Credit : arbaaz khan Instagram Story)

हेही वाचा…करण जोहरवर ‘जिगरा’ सिनेमामुळे झाला घराणेशाहीचा आरोप, इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहित म्हणाला, “मी हात जोडतो…. “

अरबाज आणि शुरा खानचं लग्न

अरबाज आणि शुरा खान यांचं गेल्या वर्षी २४ डिसेंबरला लग्न झालं. या खास समारंभात कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. अरबाजनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती.

हेही वाचा…हार्दिक पंड्यापासून विभक्त झाल्यावर नताशाने केली पहिल्या प्रोजेक्टची घोषणा; नव्या गाण्यात झळकणार, कृणाल पंड्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

अरबाजचं हे दुसरं लग्न असून, तो याआधी मलायका अरोराशी विवाहबद्ध झाला होता. त्यांनी २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला. त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. अरबाज काही काळासाठी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता, मात्र गेल्या वर्षी त्यांचं नातं संपलं.

Story img Loader