बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने गेल्यावर्षी २४ डिसेंबरला दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शूरा खान बरोबर अरबाज लग्नबंधनात अडकला. अरबाज व शूराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. शूरा खानबरोबर लग्न केल्यानंतर अरबाजने मलायकाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले असल्याची माहिती समोर आली आहे.

अरबाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अरबाजने शूरा खानबरोबर लग्न केल्यानंतर त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, दुसऱ्या लग्नानंतर अरबाजने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका आरोराला अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. अरबाज इनस्टाग्रामवर फक्त १२७ जणांना फॉलो करतो. यामध्ये त्याचा भाऊ सलमान खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा अरहान खान यांचा समावेश आहे. मात्र, या यादीत मलायकाचा समावेश नाही.

shraddha kapoor at screen event
‘द इंडियन एक्स्प्रेस’चे SCREEN मॅगझिन श्रद्धा कपूरच्या हस्ते होणार लाँच
Aishwarya Rai Bachchan Bodyguard Salary
ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा पगार किती? जाणून घ्या
hansika motwani new home gruh pravesh
बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक
Tamannaah Bhatia Questioned By ED
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये वाढ, महादेव बेटिंग APP प्रकरणात ईडीकडून चौकशी
dilip kumar secretly married with asma rehman after 16 years of marriage
१६ वर्षांच्या संसारानंतर दिलीप कुमार यांनी गुपचूप केलेलं दुसरं लग्न; सायरा बानो यांना बसलेला मोठा धक्का, नेमकं काय घडलेलं? वाचा
madhuri dixit 25th wedding anniversary
भर कार्यक्रमात प्रपोज, रोमँटिक डान्स अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरीच्या पतीची खास पोस्ट, डॉ. नेने म्हणाले…
CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
Karishma Kappor And Raj Kapoor
‘या’ कारणामुळे करिश्मा कपूर होती राज कपूर यांची लाडकी नात; करीनानेच केला खुलासा, म्हणाली…
salman khan ex girlfriend somy ali direct message to lawrence bishnoi
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची थेट लॉरेन्स बिश्नोईसाठी पोस्ट; म्हणाली, “तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचंय…”

हेही वाचा- भेटवस्तू नको तर…, आयरा खानच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास नियम; द्यावी लागणार ‘ही’ गोष्ट

मलायकाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने तिला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. मात्र, २०१७ मध्ये त्याने पुन्हा तिला फॉलो करायला सुरुवात केली. यानंतर अरबाजने पुन्हा मलायकाला कधी अनफॉलो केले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. तर दुसरीकडे मलायका अरोराही अजूनही अरबाज खानला फॉलो करत आहे. मलायकाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सच्या यादीत प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर या कलाकारांचा समावेश आहे.

मलायका अरोरा व अरबाज खानने १९९८ लग्नगाठ बांधली होती. मात्र, १९ वर्षांच्या संसारानंतर मे २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अरबाज व मलायकाला एक मुलगाही आहे. त्याचे नाव अरहान आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा व अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. तर अरबाज जॉर्जियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले आणि आता त्याने शुरा खानशी लग्नगाठ बांधली आहे. तर अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर आता मलायकाही अर्जून कपूरबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरु आहे.