बॉलिवूड सेलिब्रिटींचे अफेअर, लग्न हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अरबाज खान एकेकाळी बॉलिवूडमधील आदर्श व स्टार कपल होते. १९९८ मध्ये अरबाज व मलायकाने लग्न केलं होतं. लग्नाला १९ वर्ष झाल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण अरबाजला नेहमीच मलायकापासून दूर जाण्याची भीती वाटायची. त्याने स्वत:च एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता.
मलायकाला घटस्फोट देण्याआधी अरबाजने एका मुलाखतीत तिच्यापासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली होती. मलायकाबाबत असलेल्या भावना त्याने या मुलाखतीत व्यक्त केल्या होत्या. “या जगात मी मलायकावर सगळ्यात जास्त प्रेम करतो. मलायका माझ्यापासून दूर जावी, हे मला कधीच वाटणार नाही. सुरुवातीला तिच्याबद्दल मला असं वाटत नव्हतं. पण काही काळानंतर तिच्याबाबत मला जास्त प्रेम वाटू लागलं”, असं अरबाज म्हणाला होता.
हेही वाचा>> “मी स्वत:ला चितेवर जळताना…” इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा
हेही वाचा>>नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच क्रांती रेडकरचं दोन शब्दांत उत्तर, म्हणाली…
मलायका व अरबाज २०१७ मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांनाही धक्का बसला होता. मलायका व अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. मुलासाठी मलायका व अरबाज घटस्फोटानंतरही अनेकदा एकत्र येताना दिसतात.
दरम्यान, मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका व अर्जुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. तर अरबाज खान मॉडेल व अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. या दोघांना अनेकदा कार्यक्रमात एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे.